शेतातील सौर कृषीपंपाच्या सोलर पॅनलची साफ सफाई कशी करायची? कोणत्या चूका टाळायच्या?

Last Updated:
Solar Pump Maintainance : कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सौरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत.
1/6
agriculture
कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सौरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी होणे, वीजबिलातून सुटका आणि सिंचनासाठी खात्रीशीर पर्याय मिळणे, असे अनेक फायदे या योजनेमुळे शेतकऱ्यांना होत आहेत. मात्र, सोलर पॅनेल आणि सोलर पंपाचा वापर जितका फायदेशीर आहे, तितकाच तो योग्य काळजी न घेतल्यास धोकादायकही ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
advertisement
2/6
agriculture
अनेक शेतकरी सोलर पॅनेलवरील धूळ, मळ किंवा पक्ष्यांची विष्ठा काढण्यासाठी स्वतःच साफसफाई करतात. मात्र, या प्रक्रियेत निष्काळजीपणा केल्यास विद्युत धक्क्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सोलर पॅनेलमध्ये दिवसा सतत डीसी करंट (Direct Current) निर्माण होत असतो. सूर्यप्रकाश असताना ही यंत्रणा पूर्णपणे सक्रिय असते. अशा वेळी ओले हात, ओले कपडे किंवा सैल वायरिंग असल्यास थेट विद्युत प्रवाह शरीरात जाण्याची शक्यता असते.
advertisement
3/6
agriculture
डीसी करंटचा धक्का हा एसी करंटपेक्षा अधिक घातक ठरू शकतो. कारण डीसी करंटमध्ये हात किंवा शरीर प्रवाहात अडकले, तर ते सहजपणे सुटत नाही. त्यामुळे सोलर पॅनेलची साफसफाई करताना किंवा दुरुस्तीच्या वेळी विशेष खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अलीकडच्या काळात काही ठिकाणी सोलर पॅनेल साफ करताना शॉक लागून अपघात झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
advertisement
4/6
farmer
सोलर पॅनेलची साफसफाई करताना योग्य वेळेची निवड करणे फार महत्त्वाचे आहे. सकाळी लवकर, सूर्यप्रकाश कमी असताना किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरच पॅनेल स्वच्छ करावेत. भर दुपारी किंवा तीव्र उन्हात पॅनेल साफ करणे टाळावे. साफसफाईपूर्वी सोलर डिस्कनेक्ट स्विच पूर्णपणे बंद करणे अनिवार्य आहे. अनेक शेतकरी ही पायरी दुर्लक्षित करतात, जी अत्यंत धोकादायक ठरू शकते.
advertisement
5/6
agriculture
साफसफाईदरम्यान ओले कपडे घालू नयेत आणि हात पूर्णपणे कोरडे असावेत. लोखंडी ब्रश, धारदार वस्तू किंवा थेट हाताने पॅनेलला स्पर्श करणे टाळावे. पॅनेल स्वच्छ करण्यासाठी मऊ कापड, साधा ब्रश किंवा कमी दाबाचे पाणी वापरण्याचा सल्ला दिला जातो. शक्य असल्यास रबरचे ग्लोव्हज आणि इन्सुलेटेड चप्पल वापराव्यात. यामुळे विद्युत धक्क्याचा धोका कमी होतो.
advertisement
6/6
agriculture
तसेच, सोलर सिस्टिमजवळ लहान मुले किंवा अनधिकृत व्यक्ती फिरणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. वायरिंग सैल झाली आहे का, केबल्स झिजल्या आहेत का? कनेक्शनमध्ये ओलावा आहे का, याची तपासणी दर सहा महिन्यांनी प्रशिक्षित तज्ज्ञांकडून करून घेणे आवश्यक असल्याचे कृषी विभाग आणि ऊर्जा तज्ज्ञ सांगतात.
advertisement
Uddhav Thackeray Raj Thackeray : मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, बैठकांचा धडाका,  ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी अपडेट
मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाब
  • मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाब

  • मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाब

  • मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाब

View All
advertisement