TRENDING:

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात 'शेतकरी समृद्धी' विशेष किसान ट्रेनचा शुभारंभ, नेमका कसा फायदा होणार?

Last Updated:

special kisan train - ही ट्रेन नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, दीनदयाल उपाध्याय यासह अनेक प्रमुख स्थानकांवर थांबणार असून, शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि योग्य भावात त्यांचा माल विकण्याची संधी यामुळे मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
'शेतकरी समृद्धी' विशेष किसान ट्रेन
'शेतकरी समृद्धी' विशेष किसान ट्रेन
advertisement

नाशिक - महाराष्ट्रात 'शेतकरी समृद्धी' विशेष किसान ट्रेनचा शुभारंभ करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हस्ते व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवत देवळाली रेल्वे स्थानकावरुन या किसान ट्रेनचा शुभारंभ झाला.

काय आहे उद्देश -

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पादन झपाट्याने देशाच्या इतर राज्यात तसेच भागात पोहोचवणे, हा या विशेष किसान ट्रेनचा उद्देश आहे. ही ट्रेन नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, दीनदयाल उपाध्याय यासह अनेक प्रमुख स्थानकांवर थांबणार असून, शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि योग्य भावात त्यांचा माल विकण्याची संधी यामुळे मिळणार आहे. तसेच छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांसाठी पार्सल व्हॅनसोबतच या ट्रेनमध्ये सामान्य वर्गाचे डबेही बसवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी आणि मजूर दोघांनाही प्रवासाची सुविधा शेतकरी समृद्धी स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून मिळणार आहे.

advertisement

असे आहे वेळापत्रक -

यामध्ये रेल्वे क्रमांक 01153 साप्ताहिक शेतकरी समृद्धी स्पेशल ट्रेन 19 ऑक्टोबर 2024 पासून 9 नोव्हेंबर 2024 पर्यंत प्रत्येक शनिवारी 12:00 वाजता देवळाली येथून सूटेल आणि सोमवार 03:00 वाजता दानापुर येथे पोहचेल. तसेच रेल्वे क्रमांक 01154 साप्ताहिक शेतकरी समृद्धी स्पेशल ट्रेन 21 ऑक्टोबर 2024 पासून 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत प्रत्येक सोमवारी 10:00 वाजता दानापुर येथून सूटेल आणि दुसऱ्या दिवशी 22:30 वाजता मनमाड येथे पोहचेल. यामध्ये 10 पार्सल व्हॅन, 10 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 03 लगेज सह ब्रेक व्हॅन अशी या रेल्वेची संरचना असेल.

advertisement

थांबा कुठे -

नाशिक रोड, मनमाड जंक्शन, जळगाव, भुसावळ जंक्शन, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे या ट्रेनला थांबा असेल. ही मेल एक्सप्रेस म्हणून सर्वांसाठी कार्यरत राहील आणि प्रवासी आणि पार्सल दोन्ही वेळेवर त्यांच्या निश्चित स्थळावर पोहचतील, यासाठी या सेवेमध्ये वेळ ही वेळोवेळी सुनिश्चित केली जाणार असल्याची माहिती देण्यात अली आहे. तसेच या ट्रेनमध्ये पार्सल बुकिंगसाठी प्रीमियम पार्सल स्केल अंतर्गत दर उपलब्ध आहेत. हे दर प्रति किलोग्राम प्रति किलोमीटर परिवहन दर आकारल्या जाणार आहे.

advertisement

देवळाली ते दानापुर : 10,277

नाशिक ते दानापुर : 10.277

मनमाड ते दानापुर : 10,262

भुसावळ ते दानापुर : 10,270

परिशिष्ट मालासाठी 10.246 प्रति किलोग्राम प्रति किलोमीटर गुड सर्व्हिस टॅक्स कमी केलेले दर लागू होतील. यात तुम्हाला परिशिष्ट वस्तू आणि हार्ड पार्सल सुविधाही उपलब्ध आहे.

नाशकात 2 भावांनी सुरू केलं सी फूड रेस्टॉरंट, आईनंही दिली मोलाची साथ, महिन्याला 6 लाखांची कमाई

advertisement

ही ट्रेन सेवा स्थानिक शेतकऱ्यांसाठी आणि व्यवसायांसाठी विशेषतः उपयुक्त ठरेल, यात विशेषतः कृषी उत्पादनांच्या वाहतुकीत, डाळिंब, कच्ची केळी, अंगूर, गोभी, टमाटर, कांदा, लिंबू, आणि भुसावळ येथून आइस फिश या उत्पादनांचा समावेश आहे. हार्ड पार्सलमध्ये वॉशिंग मशीन, फ्रिज, एअर कंडिशनर, औषध आणि चटाई, जे मुख्यतः बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये पाठवले जातील, यांचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ मिळणार आहे.

देवळाली ते दानापूर या 1,515 किमी लांब अंतरावर किलोमीटर मालवाहतूक 28 पैसे प्रति किलो-ग्रॅमपेक्षा कमी असेल, यामुळे कमी खर्चात नाशवंत उत्पादनांची वाहतूक करणे शक्य होईल. या ट्रेनमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ तर मिळेलच पण कामगारांना स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाचे साधनही उपलब्ध होणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात 'शेतकरी समृद्धी' विशेष किसान ट्रेनचा शुभारंभ, नेमका कसा फायदा होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल