सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण येथे राहणारे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी 11 हजार आंब्याच्या रोपांची नर्सरी तयार केली आहे. दत्तात्रय घाडगे यांच्या नर्सरीमध्ये जवळपास 16 ते 17 जातींच्या आंब्याची झाडे आहेत. तर बाजारात जास्तीत जास्त विक्री होणारा आंबा केसर आंब्याची रोपे, सोबत दशहरी, लंगडा, नीलम, तोतापुरी, रत्ना आदी आंब्याची रोपे दत्तात्रय घाडगे यांच्या सावता माळा आंबा बाग नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत. या नर्सरीमध्ये 50 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंत किमतीचे रोप मिळत आहेत. तर या आंब्याच्या रोपांची विक्री करून दत्तात्रय घाडगे हे वर्षाला 6 ते 7 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
advertisement
Success Story: वय 18 वर्षे, कॉलेज करत तरुणी विकतेय खिचिया पापड, महिन्याला 70000 कमाई!
दत्तात्रय घाडगे यांनी रत्नागिरी येथून पावस, रत्नागिरी कोय 3 टन आणली आहे. कोयची लागवड करून 21 दिवस झाले असून जवळपास 80 टक्के उगवण सुरू झाली आहे. तसेच कलम करण्याचे काम देखील सुरू झाले आहे. कारण ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या रोपांची ते विक्री करत आहेत. दत्तात्रय घाडगे यांनी 3 किलोचा शरद आंबा आणि 2 किलोचा सावता आंबा अशा दोन आंब्यांचे पेटंट देखील मिळाले आहे.