Success Story: वय 18 वर्षे, कॉलेज करत तरुणी विकतेय खिचिया पापड, महिन्याला 70000 कमाई!

Last Updated:

नाशिकच्या हर्षदा सिद्धे या तरुणीने खिचिया पापड विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. गुजरातमध्ये जास्त प्रमाणात खाल्ल्या जाणारा हा खिचिया पापड नाशिकमध्ये सुरू केला आहे.

+
नाशिक

नाशिक मध्ये सर्वात प्रथम सुरू केला खिचिया पापड.

नाशिक: सध्याला अनेक तरुण व्यवसायाकडे वळत आहेत. कमी वयातच ध्येय गाठण्याची जिद्द असल्याने 18 व्या वर्षातच नाशिकच्या हर्षदा सिद्धे या तरुणीने खिचिया पापड विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. गुजरातमध्ये जास्त प्रमाणात खाल्ल्या जाणारा हा खिचिया पापड नाशिकमध्ये सुरू केला आहे. आता या व्यवसायाच्या माध्यमातून हर्षदा महिन्याला 60 ते 70 हजाराचे उत्पन्न देखील घेत आहे.
हर्षदा ही आता 18 वर्षाची आहे. त्यातच ती आता बी.एस.सी प्रथम वर्ष उत्तीर्ण होऊन द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेणार आहे. लहानपणापासून आई-वडिलांसोबत मुंबईला जात येत असल्याने त्या ठिकाणी हा खिचिया पापड तिने खाल्ला असल्याचे ती सांगते.
तेव्हा पासून या व्यवसायात उतरण्याचे तिने ठरविले होते. सर्वीकडे पाणीपुरी भेळ या वस्तू मिळतात. आपण काही नवीन केला तर लोकांना ते आवडेल देखील. असा विचार घरी सांगितल्यानंतर घरच्या मंडळींनी सर्वात प्रथम अभ्यासात लक्ष घाल हे सांगितले. परंतु हर्षदा हिच्या जिद्दीने तिचे व्यवसाय करण्याचे स्वप्न आज पूर्ण तिने केले आहे. 
advertisement
आज हर्षदा हिने तिच्या कमी वयातच आपला एक व्यवसाय सुरू केला आहे. तिचे आई आणि बाबा देखील तिला या व्यवसायात मदत करत असतात. तसेच हा पदार्थ काहीतरी नवीन असल्याने नाशिककर देखील हा पापड खाण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. 
advertisement
ज्या दिवशी आम्ही खिचिया पापडचे दुकान लावले त्या दिवशी त्यांच्याकडे एकही ग्राहक आला नाही. जो येईल तो फक्त पाहून निघून जात असे. घरच्यांनी देखील थोडी नाराजी दाखविली. परंतु माझ्या जिद्दीमुळे आज मी दिवसाला 50 ते 60 पापड विकत असते, हर्षदा हिने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
इतक्या कमी वयात आणि कमी वेळेत हर्षदा हिने आपली ओळख नाशिकमध्ये आपल्या या पापडामुळे बऱ्यापैकी पसरवली आहे. संध्याकाळी हर्षदा हिच्याकडे आपल्याला हा पापड खाण्यासाठी अक्षरशः वेटिंग करावी लागत आहे. हिच्याकडे हा खिचिया पापड 2 प्रकारात मिळत असतो. मसाला पापड हा फक्त 50 रुपयाला आणि चीज पापड हा फक्त 60 रुपयाला. गरम गरम कोळश्यावर भाजलेला मक्याचा आणि तांदळाचा हा पापड आणि त्यावर अनेक प्रकारचे मसाले तसेच चटणी, कांदा शेव टाकून पापड हा मिळत असतो. हर्षदा आपला हा स्टॉल रोज संध्याकाळी कॉलेज रोड परिसरात लावत असते.
मराठी बातम्या/मनी/
Success Story: वय 18 वर्षे, कॉलेज करत तरुणी विकतेय खिचिया पापड, महिन्याला 70000 कमाई!
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement