सोलापूर : कडू कारले तुपात तळले किंवा साखरेत घोळले तरी ते कडूच, अशी जुनी म्हण प्रचलित आहे. परंतु या कडू कारल्यानेच सोलापूरमधील हराळवाडी येथील शेतकऱ्याचा जीवनात गोडवा निर्माण केला आहे. या शेतकऱ्याचे नाव गोविद शेळके आहे. दोन वर्षांपासून त्यांनी कारले पिकाची कास धरली. अनुभव, अभ्यासातून त्यांनी या पिकात ‘मास्टरी’ संपादन केली. आता अडीच एकरात कारले लागवडीतून गोविंद यांनी 3 लाख रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे.
advertisement
शेतकरी गोविद शेळके हे दोन वर्षांपासून अडीच एकर क्षेत्रात कारल्याची लागवड करत आहेत. लागवडीसाठी बियाणे, मांढवं, स्टेजिंग, मल्चिंग पेपर, खते, ड्रीप, मजुरी यासाठी साधारणतः त्यांना 1 लाख रूपये त्यांना येतो. यावर्षी आत्तापर्यंत त्यांचा अडीच ते तीन टन माल तुटला असून मालाला 40 ते 45 रुपये दर मिळाला आहे. दिड ते दोन टणातून शेतकारी गोविद शेळके यांना 3 ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे.
Success Story : दहा गुंठ्यातून लाखोंचा नफा, झेंडू उत्पादक शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी
गोविंद शेळके यांनी दोन एकर क्षेत्रात दोन प्रकारचे कारले लागवड केले आहे. एक पांढरे कारले आणि एक हिरवा कारले अशा दोन प्रकारची कारल्याची लागवड त्यांनी केली आहे. कारल्याच्या वेलींना आधार दिल्यास त्यांची वाढ चांगली होते. तसेच नवीन फुटीच्या वाढीला चांगला वाव मिळतो. फळधारणा चांगली होते. दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळण्याकरिता वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीच्या आधाराने वाढवणे फायदेशीर ठरते, असं शेतकरी गोविंद शेळके यांनी सांगितलं.
लागवडीनंतर साधारणपणे 40 ते 45 दिवसानंतर फळ तोडणीस येतात. सुरुवातीच्या टप्प्यात तुलनेने कमी माल निघतो. मात्र नंतरच्या काळात उत्पादन वाढू लागताच मजुरांचे नियोजन करून काढणीच्या कामास सुरुवात केली जाते. तोडणी झाल्यानंतर कारल्याची सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विक्रीसाठी पाठवले जाते. या कारले लागवडीतून 3 ते साडे तीन लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न मिळाल्याचे शेतकरी गोविंद शेळके यांनी सांगितलं आहे.