सोलापूर : कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे मोठे भांडवल असले पाहिजे याची काही गरज नाही. केवळ तुमच्याकडे एक चांगली व्यवसायाची आयडिया हवी याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील इमदेवाडी गावात राहणारे प्रकाश इमडे हे होय. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने केवळ गायींचे शेण विकून 1 कोटी रुपयांचा अलिशान बंगला बांधला आहे. या बंगल्याचे नावही त्यांनी 'गोधन निवास' ठेवले आहे.
advertisement
सांगोला तालुक्यातील इमडेवाडी या गावात राहणारे प्रकाश इमडे त्यांच्याकडे वडिलोपार्जित 4 एकर जमिन होती. पण पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना या जमिनीत शेती करणं काही शक्य होत नव्हतं. परिणामी उपजीविकेसाठी त्यांनी गायीचं दूध विकण्याचं काम सुरू केलं. लक्षवेधी बाब म्हणजे जेव्हा त्यांनी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे केवळ 1 गाय होती. या गायीचं दूध ते गावागात जाऊन विकत असतं. अन् आज त्यांच्याकडे तब्बल 150 पेक्षा अधिक गायी आहेत. एक हुशार उद्योजक हा नेहमी आपल्या व्यवसाय कसा वाढवायचा याचा विचार करतो. प्रकाश इमडे यांनी देखील तेच केलं. त्यांनी दूधासोबतच गायीचं शेण विकण्याचाही व्यवसाय सुरू केला.
36 शेळ्यांतून 6-7 लाखांचा नफा, पारंपरिक नाही तर बंदिस्त शेळीपालनामुळे शेतकरी मालामाल
दूध आणि शेणातून वर्षाकाठी तब्बल दीड कोटीचे उत्पन्न घेणाऱ्या या प्रकाश बापूंशी बोलताना त्यांच्या अफाट अनुभव आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची सांगड घालून व्यवसाय कसा करावा याचे धडे तरुणांना मिळू शकतात. एका गायीपासून उभारलेलं वैभव भल्याभल्याना तोंडात बोट घालायला लावते. व्यवसायाला साथ दिलेल्या या गायीचा फोटो आज त्यांच्या देवघरात आहे. तिचं दर्शन घेतल्याशिवाय इमडे कुटुंबीय आपल्या दिवसाची सुरुवात करत नाहीत. या गायींच्या शेणापासून इमडे यांनी एक कोटींचा टोलेजंग बंगला आपल्या रानात उभारला आहे. या बंगल्याला नावही ‘गोधन’ निवास दिलं आहे. घरावर या गायीचा आणि दुधाच्या किटलीचा पुतळा देखील उभा केला आहे.