योजनेचे मुख्य आकर्षण काय?
भरघोस मदत असणार आहे कारण की, 3.50 लाख रुपयांपर्यंतच्या मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी शासन 3.15 लाख रुपये अनुदान देईल. बचत गटाला फक्त 10 टक्के (म्हणजे 35,000 रुपये) स्वतः खर्च करावे लागतील. या योजनेत निवड झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट गटाच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
Ayurvedic Soap Recipe : त्वचेच्या विकरांवर गुणकारी, घरीच बनवा सोप्या पद्धतीने आयुर्वेदिक साबण, Video
advertisement
लाभ घेण्यासाठी कोण पात्र असणार?
बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असावेत. गटाचे मुख्य दोन्ही पदाधिकारी (अध्यक्ष आणि सचिव) याच प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. ट्रॅक्टर खरेदी ही फक्त सरकारने अधिकृत केलेल्या कंपन्यांकडूनच करावी लागेल. ज्या गटांनी यापूर्वी अशा प्रकारच्या योजनेतून ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलरचा लाभ घेतला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
अर्ज प्रक्रिया कशी आणि कागदपत्रे कोणती लागणार?
इच्छुक बचत गटांनी 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपले अर्ज खालील कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
त्यामध्ये बचत गट नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्व सदस्यांची यादी.
प्रत्येक सदस्याचे कास्ट आणि रहिवासी (डोमेसाईल) प्रमाणपत्र.
बँक पासबुकची झेरॉक्स.
याबरोबरच 35,000 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) आवश्यक असणार आहे.
अर्ज जमा करण्याचे ठिकाण कोणते?
तुम्ही ज्या जिल्ह्यातून अर्ज करणार आहात त्या जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयात जमा करायचा आहे. समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधल्यास, योजनेची संबंधित अधिकारी तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील.
महत्त्वाची सूचना काय: जर जिल्ह्याला दिलेल्या लक्षांकापेक्षा जास्त अर्ज आले, तर लाभार्थ्यांची निवड लॉटरी (चिठ्ठी) पद्धतीने केली जाईल. त्यामुळे वेळेत अर्ज सादर करणे फायद्याचे ठरेल.





