जळगावमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी रोख रक्कम नेण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी जिनिंग, प्रेसिंग फॅक्टरी ओनर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यावर बोलताना जिल्हाधिकारी यांनी निवडणुक आयोगाच्या नियमावलीचा आधार घेत कुठलीही तरतूद नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिनिंग, प्रेसिंग फॅक्टरी ओनर्स असोसिएशनला शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करावे लागत आहे. परंतु शेतकरी त्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे सुमारे अडीच हजार कोटींचा कापूस बाजार आचारसंहितेच्या गर्तेत अडकला आहे.
advertisement
राज्यात 23 नोव्हेंबरपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. तसेच दिवाळी जवळ आल्यामुळे आणि चार पैसे मिळवण्यासाठी कापूस उत्पादक शेतकरी हे कापूस विकण्यासाठी घेऊन येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रोख पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना पैसे रोख रकमेच्या स्वरूपात घेऊन जावे लागत आहेत. मात्र आचारसंहिता सुरू असल्यामुळे वाहनांची तपासणी केली जाते. तसेच सोबत असलेली रक्कमही जप्त केली जात आहे. त्यामुळे जिनिंग व्यावसायकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: कापूस, सोयाबीन, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मळणीसाठी आलेली सोयाबीन पावसाने भिजली आहे. त्यामुळे सोयाबीनला कमी भाव मिळत आहे.
