TRENDING:

Success Story : अनेक अडचणी आल्या, मात करत मायलेकीने केली यशस्वी मशरूम शेती, महिन्याला इतकी कमाई

Last Updated:

आई अशिक्षित असल्यामुळे व्यवसायात अनेक अडचणी निर्माण होत असल्याने मुलीने आईला हातभार लावल्यापासून आज दोघी मिळून महिन्याला 70 ते 80 हजाराचे उत्पन्न देखील घेत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : व्यवसाय करण्याची आवड असल्यामुळे एका छोट्याशा गावातील माय लेकीने अत्याधुनिक पद्धतींची मशरूम शेती उभारली आहे. आई अशिक्षित असल्यामुळे व्यवसायात अनेक अडचणी निर्माण होत असल्याने मुलीने आईला हातभार लावल्यापासून आज दोघी मिळून महिन्याला 70 ते 80 हजाराचे उत्पन्न देखील घेत आहेत.
advertisement

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील हिरवे गावातील विजया शहाणे आणि तिची मुलगी पूनम शहाणे यांची ही गोष्ट आहे. त्यांना मशरूम शेतीची कल्पना कशी सुचली हे आज आपण लोकल 18 च्या माध्यमातून जाणून घेऊया.

खेडे गावात शेती शिवाय काही पर्याय नसतो आणि शेतीतून घर चालवणे भागत नाही या करता स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा या हेतूने नेहमी विचारात असलेल्या विजया शहाणे नेहमी नवीन काही शोधात असायच्या. दरम्यान गावातील महिलांचा बचत गट असल्याने सरकारकडून येणाऱ्या योजनांची माहिती त्यांना मिळत असे. याच दरम्यान उन्नती ग्रामीण अभियान अंतर्गत मशरूम शेतीची त्यांना माहिती मिळाली. सोबत 15 महिला घेऊन त्यांनी स्त्री शक्ती उद्योजक गट बनवून मशरूम शेती कशी करावी याचे प्रशिक्षण घेतले.

advertisement

Success Story : शेतकऱ्याची कमाल, एकरी घेतलं तब्बल इतकं टन उसाचे उत्पादन, अख्खं गाव पाहत राहिलं!

व्यवसायात नवीन असल्याने सुरुवातीला अनेक अडचणी येत गेल्या. पीक कसे काढावे, माल कुठे विकावा याची काही एक माहिती त्यांना नसल्याने सुरुवातीचे 2 वर्ष काही नफा झाला नसल्याचे विजया सांगत असतात. यामुळे त्यांच्या गटातील अनेक महिला निघून गेल्याने शेवटी काय करावे असा प्रश्न त्यांना निर्माण होऊ लागला.

advertisement

परंतु इतकी मेहनत घेतली, वर्ष यात निघून गेले, सहजासहजी हार कशी मानवी? आपण अधिक प्रयत्न करूया असे सोबतच्या महिलांना सांगितल्यानंतर 15 पैकी फक्त महिला जिचे नाव शैला शहाणे, आई सोबत आहे हे मुलीला समजताच पूनम हिने देखील आईला मदत करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आईच्या मशरूम आणि शेतीची प्रसिद्धी करू लागली आणि काहीच महिन्यांत याचे फळ सुद्धा मिळू लागले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

सोशल मीडियाच्या माध्यमातून विजया यांचे हे मशरूम नाशिकच्या बाहेर सुद्धा आता जाऊ लागले आहे. रोज 20 किलो मशरूम ते काढत असतात, तर 200 रुपये किलोने विक्री सुद्धा करत असतात. इतकेच नाही तर आता पूनम आईला फक्त मदतच करत नाही तर त्यांचा हा मशरूम व्यवसाय कसा करावा हे देखील इतरांना प्रशिक्षण देऊन समजावत असतात.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Success Story : अनेक अडचणी आल्या, मात करत मायलेकीने केली यशस्वी मशरूम शेती, महिन्याला इतकी कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल