TRENDING:

हाफ क्लचिंगमध्ये ट्रॅक्टर चालवताय का? मग इंजिनचे हे नुकसान होणारच

Last Updated:

Agriculture News : एक जबाबदार शेतकरी आपल्या ट्रॅक्टरकडे केवळ कामाचे साधन म्हणून पाहत नाही, तर तो त्याचा सर्वात विश्वासू साथीदार मानतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
tractor news
tractor news
advertisement

मुंबई : एक जबाबदार शेतकरी आपल्या ट्रॅक्टरकडे केवळ कामाचे साधन म्हणून पाहत नाही, तर तो त्याचा सर्वात विश्वासू साथीदार मानतो. त्यामुळे इंजिनची निगा, वेळेवर सर्व्हिसिंग, टायर्सची काळजी आणि स्वच्छता याकडे तो काटेकोर लक्ष देतो. मात्र, एवढी दक्षता घेतली तरीही अनेक वेळा गाडी चालवण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ट्रॅक्टरला मोठे तांत्रिक नुकसान होऊ शकते. यातील एक सर्वात सामान्य पण दुर्लक्षित चूक म्हणजे अपूर्ण किंवा अर्धवट क्लचिंग. ही सवय नकळत अंगवळणी पडते आणि हळूहळू ट्रॅक्टरच्या क्लच प्रणालीला गंभीर इजा पोहोचवते, ज्याचा परिणाम थेट खर्चात वाढ होण्यावर होतो.

advertisement

हाफ क्लचिंग म्हणजे नेमके काय?

ट्रॅक्टर चालवताना क्लच पेडल पूर्णपणे न दाबता ते अर्ध्यावर ठेवून एक्सीलरेटर देणे, यालाच हाफ-क्लचिंग असे म्हटले जाते. अनेक चालकांना आपण असे करत आहोत याची जाणीवही नसते. ही सवय नांगरणी, पेरणी, अवजड अवजारे चालवताना किंवा खडबडीत जमिनीवर काम करताना अधिक प्रमाणात दिसून येते. काही वेळा अडथळ्यांवरून जाताना किंवा कमी वेगात ट्रॅक्टर सांभाळण्यासाठी हाफ-क्लचिंग उपयुक्त ठरू शकते, मात्र ती सततची सवय बनणे धोकादायक आहे.

advertisement

अर्धवट क्लचिंगमुळे सर्वात जास्त नुकसान क्लच प्लेटला होते. क्लच पूर्णपणे सुटत नसल्यामुळे फ्लायव्हील आणि गिअर यांच्यात सतत घर्षण सुरू राहते. यामुळे गीअर बदलणे कठीण होते आणि दीर्घकाळात गिअरबॉक्सलाही धोका निर्माण होतो. क्लच अर्ध्यावर असल्याने इंजिनवर अनावश्यक ताण येतो आणि RPM गरजेपेक्षा जास्त वाढतो. परिणामी इंधनाचा वापर वाढतो आणि इंजिनचे आयुष्य कमी होते.

advertisement

जास्त प्रमाणात अर्ध-क्लचिंग केल्यास क्लच घसरण्याची शक्यता वाढते. सततच्या घर्षणामुळे क्लच प्लेट तापते आणि कालांतराने जळण्याची शक्यता निर्माण होते. एकदा क्लच प्लेट खराब झाली, की ती दुरुस्त किंवा बदलण्यासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च सहन करावा लागतो. त्यामुळे छोटी सवय पुढे जाऊन मोठे आर्थिक नुकसान करू शकते.

advertisement

कोणती काळजी घ्यावी?

या समस्येपासून बचाव करण्यासाठी काही साध्या पण महत्त्वाच्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, गरज नसताना क्लच पेडलवर पाय ठेवू नये. शक्य असल्यास पाय ‘डेड पेडल’वर ठेवावा. गीअर बदलताना क्लच पूर्णपणे दाबण्याची सवय लावावी, जरी ट्रॅक्टरचा क्लच घट्ट वाटत असला तरीही अर्धवट दाब देणे टाळावे. वेळोवेळी सर्व्हिसिंग करताना क्लच प्लेट आणि संपूर्ण क्लच प्रणालीची तपासणी करून घ्यावी, कारण अनेकदा या भागाकडे दुर्लक्ष होते. तसेच, दर्जेदार क्लच ऑइलचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे ऑइल दीर्घ काळासाठी वापरात राहते.

क्लच बिघडण्याचे लक्षणे कोणती?

क्लच बिघाडाची काही लक्षणे वेळेत ओळखली तर मोठे नुकसान टाळता येऊ शकते. गीअर बदलताना अडचण येणे, गीअर अडकणे, क्लच पेडल दाबताना स्पंजसारखे वाटणे, क्लच घसरणे किंवा इंजिनचा RPM अचानक वाढणे ही सर्व क्लच खराब होण्याची संकेतचिन्हे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे शेतकऱ्याच्या फायद्याचे ठरते. योग्य सवयी आणि वेळेवर देखभाल केल्यास ट्रॅक्टर दीर्घकाळ विश्वासार्हरीत्या सेवा देऊ शकतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
काळ्या तिळाची झाली भाव वाढ, आले आणि केळीचे गुरुवारी काय दर? Video
सर्व पहा

मराठी बातम्या/कृषी/
हाफ क्लचिंगमध्ये ट्रॅक्टर चालवताय का? मग इंजिनचे हे नुकसान होणारच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल