TRENDING:

काळ्या तिळाची झाली भाव वाढ, आले आणि केळीचे गुरुवारी काय दर? Video

Last Updated:

राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊया. आज आपण महत्त्वाच्या चार शेतमालांमध्ये केळी, आले, गूळ आणि तिळाची आवक आणि भाव पाहू.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: गुरुवार, दिनांक 18 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊया. आज आपण महत्त्वाच्या चार शेतमालांमध्ये केळी, आले, गूळ आणि तिळाची आवक आणि भाव पाहू.
advertisement

केळीचे आजचे दर

राज्याच्या मार्केटमध्ये 2551 क्विंटल केळीची एकूण आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 1790 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 825 ते 1025 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 300 क्विंटल केळीस प्रतीनुसार 3500 ते 4000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

गुळाची मागणी वाढली

राज्याच्या मार्केटमध्ये 2491 क्विंटल गुळाची एकूण आवक झाली. यापैकी 1504 क्विंटल सर्वाधिक आवक सांगली बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4400 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये 507 क्विंटल आवक झालेल्या गुळास प्रतीनुसार 5200 ते 5700 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.

advertisement

कांद्याचे दर पुन्हा घसरले, सोयाबीन आणि मक्याला किती मिळाला भाव? चेक करा एका क्लिकवर

आले दरात चढ-उतार

राज्याच्या मार्केटमध्ये 2264 क्विंटल आल्याची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 855 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5500 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 617 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 4030 ते 6697 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

advertisement

तिळास चांगला उठाव

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
काळ्या तिळाची झाली भाव वाढ, आले आणि केळीचे गुरुवारी काय दर? Video
सर्व पहा

आज राज्याच्या मार्केटमध्ये 142 क्विंटल तिळाची एकूण आवक राहिली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 110 क्विंटल तिळाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 12500 ते 17000 हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल पांढऱ्या तिळास 8000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.

मराठी बातम्या/कृषी/
काळ्या तिळाची झाली भाव वाढ, आले आणि केळीचे गुरुवारी काय दर? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल