मका आवक कमी
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 1 हजार 473 क्विंटल मक्याची एकूण आवक झाली. यापैकी सोलापूर मार्केटमध्ये 1 हजार 300 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1551 ते जास्तीत जास्त 1900 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल लाल मक्यास प्रतीनुसार 2400 ते 2700 रुपये भाव मिळाला.
advertisement
Weather Alert : तुफान आलंया! शुक्रवारी राज्याला पाऊस झोडपणार, 29 जिल्ह्यांना अलर्ट
कांद्याची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 6 हजार 218 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 हजार 460 क्विंटल सर्वाधिक आवक अहिल्यानगर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 900 ते जास्तीत जास्त 1400 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 710 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार कमीत कमी 1400 ते जास्तीत जास्त 2500 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला.
सोयाबीन आवकेत मोठी घट
राज्याच्या मार्केटमध्ये 5 हजार 218 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी यवतमाळ मार्केटमध्ये सर्वाधिक 2 हजार 062 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3166 ते 4088 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच नांदेड मार्केटमध्ये 110 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास प्रतीनुसार 3150 ते 4375 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.