डिसेंबर महिन्यात कांद्याचे रोप टाकण्यात येते, जानेवारीत त्याची लागवड करण्यात येते, या लागवडीसाठी 10 मजुरांची गरज भासते. फेब्रुवारी-मार्च दरम्यान कांदा काढणीला येतो. हवामान स्थिर राहिल्यास अधिक उत्पन्न मिळते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे काही वेळा नुकसानही होते. जास्त काळ कांदा सावधगिरीने साठवून ठेवला तर त्याचे भाव काही दिवसांनी वाढतात त्यामुळे चांगली कमाई होते, असे देखील चव्हाण यांनी सांगितले आहे.
advertisement
कांदा शेती महिला आणि पुरुषांनी करायला हवी, यामध्ये मेहनत आणि कष्ट घेतले तर चांगली कमाई आहे. नवीन शेतकरी कांद्याच्या शेतीचा प्रयोग सुरू करणार असतील तर त्यांच्यासाठी पुढील माहिती महत्त्वाची असणार आहे. कांद्याची लागवड केल्यानंतर दोन वेळा त्याची खुरपणी करावी लागते, कांदा काढणीला आल्यावर साठवून ठेवायचा आणि 1 महिन्यानंतर त्याला पलटी द्यावी लागते. पलटी दिल्यानंतर कांदा विक्रीसाठी तयार होतो, कांद्याची विक्री बाजारात किंवा व्यापाऱ्यांकडे करू शकतो. त्यांच्या अनुभवातून नवीन शेतकऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळत आहे.