मेष राशी
मेष राशीच्या व्यक्तींसाठी ही दिवाळी अत्यंत शुभ राहणार आहे. वैभव लक्ष्मी योगामुळे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नव्या प्रकल्पांचे प्रस्ताव मिळतील आणि करिअरमध्ये उन्नतीची नवी दारे उघडतील. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
कन्या राशी
कन्या राशीच्या जातकांसाठी ही दिवाळी विशेष ठरणार आहे. कारण हा योग त्यांच्या राशीतच निर्माण होत आहे. त्यामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी होईल. नवीन भागीदारी किंवा गुंतवणूक यशस्वी ठरेल.
advertisement
मकर राशी
मकर राशीच्या व्यक्तींसाठी त्रिग्रही योग आणि वैभव लक्ष्मी राजयोग दोन्ही अनुकूल आहेत. करिअरमध्ये नवी संधी मिळेल, तर व्यावसायिकांना मोठ्या ऑर्डर्स किंवा करार मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते. उत्पन्नवाढीच्या संधी दिसून येतील.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी राहील. त्रिग्रही योगामुळे अडकलेले प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि आर्थिक स्थैर्य वाढेल.
तूळ राशी
तूळ राशीच्या जातकांसाठी हा योग आत्मविश्वास वाढवणारा आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा ठरणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि कार्यक्षेत्रात आदर मिळेल. अविवाहितांसाठी विवाहयोग निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत नाते अधिक दृढ होईल.
सिंह राशी
सिंह राशीसाठी पंचक योग आणि वैभव लक्ष्मी योगाचे संयोग अतिशय अनुकूल ठरणार आहेत. पैशाचा ओघ वाढेल, व्यवसायिकांना नवे प्रकल्प आणि ग्राहक मिळतील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे.
(सदर बातमी फक्त माहितीसाठी असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)