मुंबई : सध्या देशभरात दिवाळीचा उत्सव आनंदात साजरा होत आहे. यंदाची दिवाळी १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीपासून सुरू झाली असून प्रत्येक घरात सजावट, आनंद आणि पूजा-अर्चा सुरू आहे. या सणात आपण नवीन कपडे, दागिने आणि विविध रंगीत वस्त्रे परिधान करतो. परंतु ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार, दिवाळीत विशेषतः आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी योग्य रंगांचे कपडे परिधान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण चुकीचा रंग देवी लक्ष्मीला अप्रिय ठरू शकतो आणि पूजेच्या शुभतेवर परिणाम होऊ शकतो.
advertisement
देवी लक्ष्मीला प्रिय रंग कोणते?
शास्त्रानुसार, देवी लक्ष्मीला लाल, पिवळा आणि सोनेरी हे रंग अत्यंत प्रिय आहेत. हे रंग ऊर्जा, संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात.
लाल रंग - शक्ती, उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक.
पिवळा रंग - ज्ञान, बुद्धिमत्ता आणि समृद्धीचे प्रतीक.
सोनेरी रंग - संपत्ती आणि ऐश्वर्याचे प्रतीक.
या तिन्ही रंगांसह केशरी, हिरवा, आकाशी निळा, हलका निळा आणि जांभळा रंग देखील शुभ मानले जातात. हे रंग सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि देवी लक्ष्मीला आकर्षित करतात. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या रंगांतील पोशाख परिधान करणे शुभफलदायी मानले जाते.
कोणते रंग टाळायचे?
दिवाळीसारख्या शुभ पर्वात काही रंग नकारात्मक ऊर्जा वाढवतात किंवा शोकाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे खालील रंग परिधान करणे टाळावे.
काळा रंग : हा रंग नकारात्मक शक्ती, दुःख आणि अंधाराचे प्रतीक आहे. त्यामुळे सणाच्या दिवशी काळा रंग टाळणे श्रेयस्कर.
पांढरा रंग : जरी हा रंग शुद्धतेचे प्रतीक असला तरी हिंदू परंपरेत तो शोकाशी संबंधित आहे. त्यामुळे दिवाळीत हा रंग परिधान करणे योग्य नाही.
राखाडी रंग : हे रंग वातावरणातील ऊर्जा कमी करतात आणि सणाच्या आनंदाशी सुसंगत राहत नाहीत.
तपकिरी व गडद निळा रंग : हे रंग गंभीरता आणि उदासी दर्शवतात, जे दिवाळीच्या आनंददायी वातावरणाशी जुळत नाहीत.
पूजेदरम्यान रंगांचे आध्यात्मिक महत्त्व
हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचा आध्यात्मिक अर्थ आहे. पूजेदरम्यान योग्य रंग परिधान केल्याने व्यक्तीची ऊर्जा वाढते, मन एकाग्र होते आणि पूजेचा प्रभाव अधिक तीव्र होतो. देवी लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी मनापासून भक्तीबरोबरच पोशाखाचे रंग देखील तिच्या आवडीप्रमाणे असणे महत्त्वाचे आहे.
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही )