मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हे कर्मफलदाते आणि न्यायाचे अधिपती मानले जातात. ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे त्यांच्या हालचाली म्हणजेच वक्री आणि मार्गी गती मानवी जीवनावर खोल परिणाम घडवतात. यावर्षी दिवाळीचा सण २० ऑक्टोबर २०२५ रोजीपासून सुरू झाला आहे. आणि त्याच दिवशी शनिदेव वक्री गतीत असतील. त्यामुळे काही राशींवर त्यांच्या कृपेचा वर्षाव होणार असून या व्यक्तींना अनपेक्षित आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे.
advertisement
मिथुन राशी
या दिवाळीत शनिदेवाची वक्री गती मिथुन राशीसाठी अत्यंत लाभदायी ठरेल. शनी तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या भावात असल्याने, या काळात तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठी प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक आणि पदोन्नतीची शक्यता. नोकरी शोधणाऱ्यांना योग्य संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी नवीन करार, विस्तार आणि नफा होण्याची चिन्हे आहेत. नवीन प्रकल्प किंवा भागीदारी सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. एकंदरीत, शनिदेवाची वक्री गती मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थैर्य, व्यावसायिक वाढ आणि समाजातील प्रतिष्ठा वाढवणारी ठरेल.
कर्क राशी
शनीची वक्री गती कर्क राशीच्या भाग्यस्थानात होत असल्याने, या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि परिवर्तनकारी ठरेल. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आर्थिक समस्या सुटतील. नवीन घर, वाहन किंवा मालमत्ता खरेदीची संधी मिळू शकते. नशीब तुमच्या बाजूने राहील आणि महत्त्वाचे निर्णय यशस्वी ठरतील. मोठ्या व्यवसाय करारातून अनपेक्षित नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, गुंतवणुकीतून फायदा होईल. या काळात धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. काही जणांना विदेश प्रवास किंवा करिअर विस्ताराच्या संधी मिळू शकतात.
मकर राशी
शनिदेव मकर राशीपासून तिसऱ्या स्थानावर वक्री भ्रमण करत असल्याने, ही वक्री गती मकर राशीच्या लोकांसाठीही शुभ संकेत घेऊन येत आहे. परदेशाशी संबंधित व्यवसाय असणाऱ्यांना मोठा फायदा मिळेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता. नोकरीत इच्छित बदली किंवा बढतीची संधी मिळेल. कुटुंब आणि भावंडांकडून सहकार्य मिळेल, घरात सौख्य वाढेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात तुम्हाला आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढलेली जाणवेल. दिवाळीचा काळ तुमच्यासाठी सकारात्मक बदल, प्रगती आणि आर्थिक वाढ घेऊन येईल.
(सदर बातमी फक्त माहितीकरीता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)