मुंबई : आज देवशयनी आषाढी एकादशीचं व्रत आहे, आजपासून २०२५ चा चातुर्मास देखील सुरू होईल. आषाढी एकादशी, हरिषयनी एकादशी किंवा पद्म एकादशी असेही म्हणतात. दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला ही एकादशी व्रत पाळलं जातं. आषाढी एकादशी हा पंढरपूर वारीचा मुख्य दिवस असतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी अनेक दिवसांपासून पायी चालत पंढरपूरमध्ये दाखल झालेले असतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज अशा अनेक संतांच्या पालख्या आणि दिंड्या या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचतात. हा सोहळा भक्ती, उत्साह आणि एकतेचे प्रतीक आहे.
advertisement
तसेच हा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात. चार महिने क्षीरसागरात निद्रा घेतात, ज्यामुळे शुभ कार्ये करता येत नाहीत. भक्तांसाठी हा दिवस केवळ उपवास किंवा पूजा नाही तर आध्यात्मिक संबंधाची संधी आहे. देवशयनी एकादशी, पूजाविधी, पूजा मुहूर्त, मंत्र यांचे महत्त्व जाणून घेऊया.
देवशयनी एकादशी व्रताचे महत्त्व
हिंदू धर्मात देवशयनी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने योग निद्रामध्ये जातात, या काळाला चातुर्मास म्हणतात. यानंतर, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ते जागे होतात. श्री विष्णू विश्रांती घेत असल्यानं महादेव विश्वाचा कारभार स्वीकारतात असे मानले जाते. देवशयनी एकादशीबद्दल पुराणात असे नमूद केले आहे की, या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीला शंभर यज्ञांचे फळ मिळते. श्री हरीच्या विशेष कृपेने जीवनात शांती, संतुलन आणि समृद्धी येते. देवशयनी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्ती जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होते, असे मानले जाते.
देवशयनी एकादशी व्रत 2025 -
एकादशी तिथी सुरू होते - 5 जुलै, संध्याकाळी 6:58 पासून
एकादशी तिथी समाप्त - 6 जुलै, रात्री 9:14 पर्यंत
उदयतिथीनुसार रविवारी, ६ जुलै रोजी देवशयनी एकादशीचे व्रत.
देवशयनी एकादशी उपवास सोडण्याची वेळ - ७ जुलै, सकाळी ५:२९ ते ८:१६
देवशयनी एकादशी व्रत शुभ योग -
देवशयनी एकादशीला एक-दोन नव्हे तर 6 महाशुभ योगांचा दुर्मिळ संयोग होत असून, त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. सूर्य आणि गुरु मिथुन राशीत असल्यामुळे गुरु आदित्य योग तयार होत आहे, मालव्य राजयोग, त्रिपुष्कर योग, रवियोग साध्य आणि शुभ योग शुक्र वृषभ राशीत असल्यामुळे तयार होत आहे. या शुभ योगांमध्ये पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल.
देवशयनी एकादशी मंत्र
'शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्॥'
'ॐ नमो भगवते वासुदेवाय'
इस मंत्र का तुलसी की माला के साथ सुबह शाम 108 बार जाप करें.
'श्री विष्णवे नमः'
मंत्र का जप तुलसी की माला के साथ सुबह शाम 108 बार जाप करें.
जुलैमध्ये पापी ग्रह केतुच्या स्थितीत बदल! 3 राशींचे अनपेक्षित चमकणार नशीब
पांडुरंगाची आरती -
युगे अठ्ठाविस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा। पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा। चरणी ठेविले मस्तक विटेवरी उभा॥१॥
तुळसीमाळा गळा कर ठेऊनि कटी। कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी। देव सुरवर नित्य येती भेटी। गरुड हनुमंत पुढे उभे राहती॥२॥
धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पाळा। सुमने सुंदर शोभती गळा। चरणी तुळसी ठेविती गोपाळा। विठ्ठल रुक्मिणी जय विठ्ठला॥३॥
आरती ओवाळू चक्रपाणी। ओवाळू आरती चक्रपाणी। पांडुरंगा देवा रे देवा रे पांडुरंगा। युगे अठ्ठाविस विटेवरी उभा। पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा। चरणी ठेविले मस्तक विटेवरी उभा॥४॥
आषाढी एकादशीच्या उपवासामध्ये नेमकं काय खावंं? अनेकांकडून कोणत्या चुका होतात पहा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)