'या' 3 राशींना मिळणार भाग्याची साथ
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग वरदानापेक्षा कमी नाही. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली तुमची कामे अचानक गती घेतील. जे जातक स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत आहेत, त्यांना मोठी गुंतवणूक किंवा कर्ज सहज उपलब्ध होईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि मान-सन्मान मिळेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळण्याचे दाट संकेत आहेत.
advertisement
सिंह
सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ आर्थिक सुबत्ता घेऊन येईल. सूर्याच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला असेल. नोकरीत बढती आणि पगारवाढीचे प्रबळ योग आहेत. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर 28 जानेवारीनंतर ते परत मिळण्यास सुरुवात होईल. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद संपुष्टात येतील.
कुंभ
कुंभ राशीचा स्वामी शनी आहे आणि 30 वर्षांनंतर शनीची ही विशेष स्थिती तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. करिअरमध्ये तुम्हाला एखादी मोठी संधी मिळेल, ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात. वैवाहिक जीवनात गोडवा येईल आणि जोडीदाराच्या मदतीने मोठी प्रगती होईल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
