पण तुम्हाला माहित आहे का की धनत्रयोदशी व्यतिरिक्त आणखी कोणत्या दिवशी झाडू विकत घेऊन घरी आणणे शुभ मानले जाते? जाणून घेऊया.
कृष्ण पक्ष - हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे दोन पक्ष असतात. पहिले १५ दिवस कृष्ण पक्ष आणि दुसरे १५ दिवस शुक्ल पक्ष. वास्तूनुसार, कोणत्याही महिन्याच्या कृष्ण पक्षात झाडू खरेदी करणे उत्तम असते. शुक्ल पक्षात झाडू खरेदी करू नये. कृष्ण पक्षात खरेदी केलेल्या झाडूमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि धन-धान्यात वाढ करते.
advertisement
शनिवार - शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. असे असूनही, शुक्रवारी घरात नवीन झाडू आणणे अशुभ मानले जाते. झाडू खरेदी करण्यासाठी शनिवारचा दिवस सर्वात उत्तम असतो आणि या दिवशी नवीन झाडू खरेदी करून आणल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, असे म्हणतात.
दिवाळी - घरात नवीन झाडू आणण्यासाठी दिवाळी हा आणखी एक चांगला आणि आदर्श प्रसंग आहे. दिवाळीला नवीन झाडू खरेदी केल्यास दरिद्रता घरातून बाहेर जाते आणि सुख-समृद्धीचा प्रवेश होतो, असे म्हणतात.
सिंह कन्या तूळ वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; आनंद वार्ता सण द्विगुणित करेल
अक्षय्य तृतीया - वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीयेला देखील नवीन झाडू खरेदी करून आणणे शुभ मानले जाते. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळपर्यंत लाभ देतात, असेही म्हणतात.
नवरात्री - चैत्र नवरात्र किंवा शारदीय नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरही नवीन झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. बहुतेक लोक तर नवरात्रीपूर्वीची साफसफाई देखील नवीन झाडूनेच करतात. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
कृष्ण पक्षातील शनिवार - हिंदू धर्मातील कोणत्याही महिन्याच्या कृष्ण पक्षातील शनिवारी झाडू खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, या शुभ योगावर झाडू खरेदी केल्याने आर्थिक स्थितीला बळ मिळते आणि धन-धान्याची प्राप्ती होते.
यंदाची धनत्रयोदशी टर्निंग पॉईंट! तूळ, मकर, कर्क राशींच्या लोकांनी आता तयारीत रहा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)