कसा असेल नोव्हेंबर?
मेष राशीच्या व्यक्तींना परिश्रम करावे लागणार असून हा महिना उत्साही आणि मिश्र फळ देणारा जाणार आहे. मेष रास ही मंगळाची रास आहे. या राशीची व्यक्ती कोणतीही गोष्ट विचार न करताच करून मोकळी होते. या महिन्यात तुम्हाला परिश्रमाने यश प्राप्ती करून घ्यावी लागेल. हा महिना उत्साहवर्धक असून अनुकूल आहे, असं भविष्य गोरे यांनी सांगितलंय.
advertisement
Numerology: या जन्मतारखेच्या व्यक्ती भरपूर महत्त्वाकांक्षी, हवं ते मिळवतात; पण एक गोष्ट घात करते
या महिन्यात पाच ग्रह बदलणार आहेत. 4 नोव्हेंबर रोजी शनी मार्गी होत आहे. 6 नोव्हेंबर रोजी बुध वृश्चिक राशीत येतो. त्यानंतर पुन्हा बुध 26 नोव्हेंबर रोजी धनु राशीत येणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी रवी वृश्चिक राशीत येणार आहे. महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आणि नंतर 29 नोव्हेंबर रोजी तो तुळ राशीत येणार आहे. या संपूर्ण महिन्यात मंगळाचा अस्त आहे. राहू आणि केतू देखील राशी बदल करणार असून ते लाभ देतील. हा संपूर्ण महिना गुरू वक्री राहणार आहे. ही संपूर्ण परिस्थिती मेष राशीच्या व्यक्तींसाठी मिश्र फळ देईल, असं गोरे यांनी सांगितलंय.
Astro: कुंडलीत हा अशुभ योग असेल तर प्रयत्नांना नाही मिळत यश; या उपायांनी करू शकता नीट
या महिन्यात यश खेचून आणावे लागणार आहे. अथक परिश्रम करावे लागणार आहे. शांत राहणे गरजेचे आहे. अंगावर कोणतेही दुखणे काढू नये. छोट्या मोठ्या व्याधींवर पटकन वैद्यकीय सल्ला घेऊन लवकरात लवकर ट्रिटमेंट सुरू करावी. उष्णतेचे विकार या महिन्यात अधिक त्रस्त करू शकतात. वाहन सावकाश चालवा. धनसंपदा वाचवण्याचा प्रयत्न कराल. गाडी घेणे, घर घेणे यासारख्या सुखांची रेलचेल होऊ शकते. असे असले तरी जुन्या प्रॉपर्टीचे प्रश्न उद्भवू शकतात. पती पत्नीमध्ये वाद झाले तर नमते घ्या आणि शांत रहा. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील, असंही गोरे यांनी सांगितलंय.
या आहेत शुभ तारखा
2 ,3, 9,10,18 ते 21, 29, 30 या तारखांना शुभ कार्याची सुरुवात करा.
या आहेत अशुभ तारखा
नोव्हेंबर महिन्यातील 4, 5, 14, 15, 23, 24 तारखांना महत्त्वाची कामे करू नका.
Gemstone tips: करंगळीत हे रत्न धारण करण्याचा होतो विशेष लाभ, प्रत्येक कामात दिसेल शुभ परिणाम
अश्विन महिना सुरू असून नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला दीपावली उत्सव सुरू होईल. या महिन्यात अनेक योग तसेच ग्रहांची युती होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच सर्व गोष्टी शांततेत विचार करून केल्या आणि परिश्रम केले तर मेष राशीच्या व्यक्तींना हा महिना मिश्र फळ देईल, अशी माहिती गोरे यांनी दिली.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





