ज्योतिष शास्त्रानुसार, या दोन राशी काही काळ आकर्षणामुळे एकमेकांच्या प्रेमात राहू शकतात. मात्र, ते कायमस्वरुपी सहजीवनात राहणं मुश्कील. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, काही राशी ज्या कधीही एकत्र राहू शकत नाहीत. प्रेमविवाहात तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की, लग्नानंतर खूप फरक पडतो. प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते. हे जोडपे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. मात्र पुढे ते एकमेकांचे शत्रू बनतात.
advertisement
ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, मकर आणि सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये प्रेम कधीच होऊ शकत नाही. मकर ही अंतर्मुखी राशी आहे. म्हणजेच अशा लोकांना एकटे आणि गंभीर राहणे आवडते. जास्त लाइमलाइट, प्रवास किंवा पार्ट्यांमध्ये जाणे आवडत नाही. त्यांना जास्त मित्र बनवणे आवडत नाही, ते स्वतःमध्ये व्यस्त राहतात. दुसरीकडे, सिंह राशीचे लोक खूप पार्टी करणारे असतात.
या लोकांना लोकप्रियता आवडते. त्यांना चमकदार आयुष्य हवे आहे. नेहमी पार्टी करायला, मित्रांसोबत हँग आउट करायला आणि बाहेर जायला आवडते. यामुळेच या दोन राशींचे स्वभाव एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. थोड्या काळासाठी ते एकमेकांच्या प्रेमात पडू शकतात, परंतु कालांतराने त्यांच्यात प्रत्येक छोट्या गोष्टीवरून वाद होतात. त्यामुळे नातेसंबंध धोक्यात येतात.
काही काळापूर्वी गमावलेलं परत मिळणार! या मूलांकांना लॉटरी लागणार, कष्टाचं फळ
प्रत्येक राशीचा स्वभाव -
प्रत्येक राशीच्या लोकांचा स्वतःचा स्वभाव असतो. मिथुन राशीचे लोक खूप मोकळे आणि बुद्धिमान असतात. जर तुम्ही अशा लोकांना तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसोबत जोडले तर त्यांची साथ चांगली राहील. कारण, या तिघांचा स्वभाव सारखाच आहे. मात्र, जर तुम्ही मिथुन राशीला सिंह राशीसोबत ठेवले तर दोघेही एकत्र राहू शकत नाही. या दोघांचा स्वभाव विरुद्ध आहे. यामुळेच विरुद्ध प्रकृतीच्या लोकांमध्ये भविष्यात समस्या निर्माण होतात आणि काही वेळा संबंध संपुष्टात येतात, असे त्यांनी सांगितले.
इंग्रजी 'A' अक्षरानं नावाची सुरुवात होते? असे गुण-दोष तुमच्यात नक्की असणार
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
