Numerology: काही काळापूर्वी गमावलेलं परत मिळणार! या मूलांकांना लॉटरी लागणार, कष्टाचं फळ
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Today Numerology in Marathi 26 January 2025: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 26 जानेवारी 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
काही काळापूर्वी गमावलेलं काही तरी अचानक पुन्हा गवसेल. हुशारी आणि स्पर्धात्मकतेमुळे पुढे राहाल. दरवाजे व्यवस्थित बंद करा. हळहळण्यापेक्षा आधीच सुरक्षित राहणं चांगलं ओव्हरसीज मार्केटमध्ये प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्सकडून दखल घेतली गेल्यामुळे तुमच्या सर्कलमध्ये तुमचं खूप कौतुक होईल. जोडीदाराची प्रकृती चांगली नाही. त्याला/तिला आनंदी ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करा.
Lucky Number : 6
Lucky Colour : Pink
advertisement
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सरकारशी निगडित कामं हळूहळू प्रगती करतील. दिवसभर अनिश्चितता राहील. डोळ्यांची समस्या चिंताजनक ठरेल. वैद्यकीय सल्ला घ्या. खर्चांवर नियंत्रण आणा. केवळ दिखाऊपणा जपण्यासाठी विचार न करता खर्च करू नका. नव्या रिलेशनशिपमध्ये व्यग्र असाल. तिचं चांगलं भरणपोषण करा. त्यातून रिलेशनशिप प्रेरक ठरेल.
advertisement
Lucky Number : 2
Lucky Colour : Yellow
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
घरात मतभेद टाळा. संमिश्र भावना असतील. आरोग्याची काळजी घ्या. खर्च होणारी रक्कम जास्त असेल. या काळात फिजिकल रिलेशनशिप आनंद देणार नाही.
advertisement
Lucky Number : 9
Lucky Colour : Peach
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमच्या संस्थेच्या मॅनेजमेंट सर्कल्समध्ये तुमचे दृष्टिकोन गांभीर्याने घेतले जातील. आज ज्ञानाच्या शोधात असाल, दिवसभर पुस्तकांच्या सहवासात असाल. तापासारखं वाटेल. काळजी घ्या. प्रमोशन किंवा उत्तम बिझनेस प्रपोझल तुमच्यासमोर येईल. त्याचा पूर्ण उपयोग करा. आज विवाहबाह्य संबंधांत अडकण्याची शक्यता आहे.
advertisement
Lucky Number : 17
Lucky Colour : Grey
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
घरातला सलोखा ही चिंतेची बाब बनेल. अवलंबित्वाची भावना दिवसभर राहील. आरोग्य चांगलं असल्याने उत्साह असेल. लवचिक दृष्टिकोनामुळे बिझनेसच्या बदलत्या गरजा समजून घ्याल आणि त्या प्रभावीपणे पूर्ण कराल. एखाद्या व्यक्तीला आदर्श मानताना सावध राहा. नंतर भ्रमनिरास होऊ शकतो.
advertisement
Lucky Number : 8
Lucky Colour : Red
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
प्रामाणिकपणा आणि नाकासमोर चालण्याच्या गुणामुळे फायदा होईल. कला, साहित्य, संगीतात खूप रस घ्याल. सुरक्षित राहा. विरोधक जवळच आहेत. गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे. या वेळी रोमान्स म्हणजे तुमच्या दृष्टीने फ्लर्टेशनपेक्षा अधिक काही नाही.
advertisement
Lucky Number : 5
Lucky Colour : White
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
दीर्घ काळ चाललेल्या न्यायालयीन लढाईचा निकाल तुम्हाला अनुकूल लागेल. आज ज्ञानाच्या शोधात असाल आणि दिवसभर पुस्तकांच्या सहवासात असाल. मानसिक आणि शारीरिक टेन्शन्स असली, तरी विरोधकांवर मात कराल. स्टॉक मार्केट किंवा रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं या वेळी चांगलं ठरेल. प्रेमाची घोषणा कराल.
Lucky Number : 8
Lucky Colour : Blue
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
संध्याकाळी सोशल गेट-टुगेदर महत्त्वपूर्ण हेतू साध्य करील. आरामदायी जीवनशैली पीअर्सवर प्रभाव टाकील. तापासारखं वाटेल. काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी एकमेकांमधल्या समस्या डिप्रेशनचं कारण ठरतील. रोमान्स बहरेल. जोडीदारासमवेत काही संस्मरणीय क्षण व्यतीत कराल.
Lucky Number : 3
Lucky Colour : Green
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
ज्या प्रत्येकाला तुम्ही भेटाल, ती प्रत्येक व्यक्ती मदत करणारी आणि पुढे येणारी असेल. आज चांगल्या मूडमध्ये असाल. रिअल इस्टेटच्या व्यवहारासाठी काही चांगल्या दिवसांपैकी हा एक दिवस आहे. पूर्वी बंद केलेले मार्ग कष्ट आणि बुद्धिमत्तेमुळे पुन्हा खुले होतील. आक्रमक जोडीदारामुळे काही समस्या निर्माण होतील.
Lucky Number : 7
Lucky Colour : Brown
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 25, 2025 8:23 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: काही काळापूर्वी गमावलेलं परत मिळणार! या मूलांकांना लॉटरी लागणार, कष्टाचं फळ


