Amavasya 2025: पितृदोषातून कुटुंबाची सुटका! पौष दर्श अमावस्येला या मंत्राचा जप लाभदायी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Amavasya 2025: तुम्हालाही अतृप्त पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल, तर आज दर्श अमावस्येच्या दिवशी काही विशेष मंत्र आणि स्तोत्रांचे पठण करावे.
मुंबई: पौष महिन्यातील अमावस्या आपण दर्श अमावस्या म्हणून साजरी करतो. ही अमावस्या बुधवारी 29 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला अमावस्या तिथीचा स्वामी मानले जाते. अमावस्येला शनिदेवाची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान आणि तर्पण करणे आवश्यक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, दर्श अमावस्येला पितरांची पूजा केल्यानं उत्पन्नात वृद्धीसोबतच जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते.
पूजा करताना अनेकदा लोक काही चुका करतात, ज्यामुळे पितर नाराज होतात. या चुकांमुळे माणसाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हालाही अतृप्त पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल, तर आज दर्श अमावस्येच्या दिवशी काही विशेष मंत्र आणि स्तोत्रांचे पठण करावे. असे मानले जाते की, या मंत्र आणि स्तोत्रांचे पठण केल्यानं पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि आपले जीवन आनंदी होते.
advertisement
मौनी अमावस्येला या पितृ स्तोत्रांचे पठण करा -
अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम् ।
नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम् ॥
इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा ।
सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान् ॥
सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान् ॥
मौनी अमावस्येला या मंत्रांचा जप करा -
मौनी अमावस्येला विधीनुसार पूजा आणि व्रत केल्यानं व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते. जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर आज मौनी अमावस्येला खालील मंत्राचा 108 वेळा जप करा.
advertisement
ॐ आद्य-भूताय विद्महे सर्व-सेव्याय धीमहि।
शिव-शक्ति-स्वरूपेण पितृ-देव प्रचोदयात्’
दर्श अमावस्येला काय करावं?
हिंदू धर्मात अमावस्या तिथींना विशेष महत्त्व आहे. या दिवशी मौनव्रत पाळल्यानं मनाला शांती मिळते असे म्हणतात. याशिवाय दर्श अमावस्येला पवित्र नदीत स्नान करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. याशिवाय भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी व्रत देखील पाळले जाते. दर्श अमावस्येला तिळाचे तेल लावून स्नान करावे आणि गरिबांना तीळ दान करावे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 25, 2025 1:37 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Amavasya 2025: पितृदोषातून कुटुंबाची सुटका! पौष दर्श अमावस्येला या मंत्राचा जप लाभदायी


