Masik Shivratri: हर हर महादेव! मासिक शिवरात्री-सोमप्रदोष एकत्र येण्याचा दुर्मीळ योग; पूजा-विधी-धार्मिक महत्त्व
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Masik Shivratri: मासिक शिवरात्रीला व्रत-उपवास केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करून आणि उपवास केल्याने इच्छा पूर्ण होतात. यामुळे जीवनात आनंद आणि शांती येते.
मुंबई : हिंदू धर्मात मासिक शिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. या महिन्याची मासिक शिवरात्री अतिशय खास असणार आहे, कारण या दिवशी सोमवार असून सोमप्रदोषही त्याच दिवशी आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करण्याची परंपरा आहे. मासिक शिवरात्रीला व्रत-उपवास केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करून आणि उपवास केल्याने इच्छा पूर्ण होतात. यामुळे जीवनात आनंद आणि शांती येते. हिंदू धर्मात मासिक शिवरात्रीचे व्रत खूप फलदायी मानले जाते. 2025 सालची पहिली मासिक शिवरात्री कधी साजरी होईल तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊ.
मासिक शिवरात्री कधी आहे?
हिंदू कॅलेंडरनुसार, 2025 ची पहिली मासिक शिवरात्र पौष महिन्यात येईल. पंचांगानुसार, या वर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 27 जानेवारी 2025 रोजी रात्री 08:34 वाजता सुरू होईल आणि ही तिथी 28 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 07:35 वाजता संपेल. मासिक शिवरात्रीचे व्रत 27 जानेवारी 2025 रोजी पाळले जाईल.
advertisement
पूजेचा शुभ मुहूर्त -
मासिक शिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 05:26 वाजता सुरू होईल. निशिता काळात भगवान शंकराची पूजा सर्वात शुभ मानली जाते. निशिता काळात पूजेची मुहूर्त रात्री 12.07 ते 01 वाजेपर्यंत असेल. या शुभ मुहूर्तावर भगवान शिवाची पूजा केली जाईल.
advertisement
मासिक शिवरात्रीचे महत्त्व -
धार्मिक मान्यतेनुसार, मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यासोबतच भगवान शिवाच्या कृपेने कुटुंबात सुख, शांती आणि संपत्ती वाढते. ज्या मुलींच्या लग्नात अडचणी येत आहेत, त्या देखील हे व्रत ठेवू शकतात. या दिवशी खऱ्या भक्तीभावाने पूजा करून उपवास केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 25, 2025 12:03 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Masik Shivratri: हर हर महादेव! मासिक शिवरात्री-सोमप्रदोष एकत्र येण्याचा दुर्मीळ योग; पूजा-विधी-धार्मिक महत्त्व


