Weekly Rashi Bhavishya In Marathi: जानेवारीचा शेवटचा आठवडा या राशींना भाग्याचा; शुभ ग्रहमान हाती आणेल पैसाच-पैसा
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Saptahik Rashibhavishy In Marathi: जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असेल, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं 27 जानेवारी ते 03 फेब्रुवारी 2025 या आठवड्यासाठीचं राशीभविष्य.
मेष (Aries) - आधी स्वतःला जपणं आणि कौतुक करणं आवश्यक आहे. प्रमोशन आणि पगारवाढीमुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. तूर्तास कर्ज फेडू नका. कारण तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागेल. प्रिय व्यक्तीची उपस्थिती तुम्हाला आनंदी करील. तुम्हाला दृढ नातेसंबंध हवे असतील, तर नम्र राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक सहकारी तुम्हाला दीर्घकालीन पार्टनरशिपचा प्रस्ताव देऊ शकतो. परंतु घाई करू नये. शिक्षणासाठी एक तंत्र तयार करून ते पाळावं लागेल. आक्रमकता टाळा, कारण ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हिरव्या पालेभाज्या असलेला आहार घ्या. शक्ती वाढेल. खेळात सहभागी व्हायचं असेल, तर आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.Lucky Color : BrownLucky Number : 5
advertisement
वृषभ (Taurus) - आगामी आठवडा वेगळ्या अनुभवांनी भरलेला असेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणूक अतिशय सावधगिरीने करा. त्यामुळे भविष्यातली आर्थिक चिंता कमी होईल. प्रेमाच्या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद हवा असेल, तर प्रपोझ करण्यासाठी थोडं थांबा. व्यवसायात सावधगिरीने पावलं उचला. काही दिवसांपासून चाललेला गोंधळ कमी होईल. त्यामुळे कामात सुधारणा होईल. माहिती वाढवत राहण्यासाठी शिक्षणात सातत्य ठेवा. ज्यांनी शिक्षणात खूप मेहनत केली आहे, त्यांना यशाची संधी आहे. आरोग्य चांगलं असेल. भरपूर व्यायाम करा. फिरायला जा.Lucky Color : Sky BlueLucky Number : 1
advertisement
मिथुन (Gemini) - पगारवाढ, रिएंबर्समेंट किंवा मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळण्याची शक्यता आहे. संशोधनासाठी समर्पित असलेल्या व्यक्तींना चांगलं यश मिळेल. लग्नाचं प्रपोझल स्वीकारण्यासाठी काळ अनुकूल आहे. व्यवसायात प्रयत्नांमुळे चांगलं यश मिळेल. नवी नोकरी किंवा प्रमोशन मिळेल. शिक्षणासाठी सेल्फ स्टडीवर लक्ष केंद्रित करा. अपूर्ण कामं पूर्ण करा. कामाच्या आणि विश्रांतीच्या वेळेत संतुलन राखा.Lucky Color : CreamLucky Number : 4
advertisement
कर्क (Cancer) - आठवडाभर शांत राहिल्यास समस्यांवर उपाय शोधण्यासाठी मन मोकळं राहील. यशस्वी होण्यासाठी शिस्तीत राहणं आणि खर्चाचं नियोजन आवश्यक आहे. प्रेमसंबंधांविषयीचे सध्याचे निर्णय भविष्यात परिणाम करतील. व्यवसायात सातत्यपूर्ण प्रगती होईल; पण वेळेचं नियोजन महत्त्वाचं ठरेल. गुरूंच्या मार्गदर्शनामुळे प्रगतीला मदत होईल. बेफिकिरीमुळे आरोग्याची समस्या उद्भवू शकते. आहार, खूप पाणी पिणं आणि ध्यानधारणा यांच्या साह्याने आरोग्य उत्तम राहू शकतं.Lucky Color : PurpleLucky Number : 12
advertisement
सिंह (Leo) - सेलेब्रिटीज तुमच्या बाजूने नसतील, तरी कुटुंबाच्या सुखाला, आरोग्याला प्राधान्य द्यावं लागेल. आर्थिक ताणामुळे नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. जास्त ताप येऊ शकतो. कामात शांत चित्ताने टिकून राहा. शिक्षणासाठी संयम आणि परिश्रम गरजेचे आहेत. सातत्यपूर्ण परिश्रम सकारात्मक परिणाम देतात. कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणं तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.Lucky Color : RedLucky Number : 9
advertisement
कन्या (Virgo) - नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रलंबित येणी वसूल होतील. प्रेमात जोडीदाराला व्यक्त होण्यासाठी स्वातंत्र्य द्या. व्यवसायात चांगली प्रगती होईल. नवीन महत्त्वपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. फर्मच्या यशासाठी ते महत्त्वाचं ठरेल. कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शांत ठिकाण निवडा. तणाव नियंत्रणासाठी आहारात मीठ कमी करा आणि व्यायाम नियमितपणे करा.Lucky Color : BlueLucky Number : 6
advertisement
तूळ (Libra) - हा आठवडा चमत्कार, आश्चर्य आणि आशीर्वादाने भरलेला असेल. पैशांची उधळपट्टी टाळा. कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करा. प्रेमसंबंध जपण्यासाठी काळजीपूर्वक, सहानुभूतीने वागा. व्यावसायिकांसाठी आठवड्याच्या मध्यातला काळ कठीण असेल; पण अखेरीस यश मिळेल. शिकण्यात सातत्य ठेवल्यास उद्दिष्टपूर्ती होईल. आरोग्य चांगलं राहील.Lucky Color : GreenLucky Number : 11
advertisement
वृश्चिक (Scorpio) - परदेशातून आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी कामाच्या अपेक्षा परवडतील एवढ्याच ठेवा. प्रेमात स्पष्टता राखा. जोडीदाराच्या वागण्यावर लक्ष ठेवा. कुणावरही धर्म लादू नका. आर्थिक व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवा. प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा, असमाधानी होऊ नका. कमी महत्त्वाच्या गोष्टींना अति महत्त्व देऊ नका. मानसिक ताण वाढेल. योग्य आहार, भरपूर पाणी आणि ध्यानधारणा या गोष्टी इम्युनिटीसाठी आवश्यक आहेत.Lucky Color : GreyLucky Number : 3
advertisement
धनू (Sagittarius) - वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगलं आर्थिक संतुलन राहील. पैशांचा प्रवाह चांगला असेल; पण आव्हानंही असू शकतात. प्रेमसंबंधात अनावश्यक वाद टाळा. सिंगल व्यक्तींना कोणी भेटण्याची शक्यता आहे. परफॉर्मन्स उत्तम असेल. शिक्षणासाठी आठवडा चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.Lucky Color : YellowLucky Number : 10
advertisement
मकर (Capricorn) - स्वतःवर असलेला विश्वास क्षमतेपेक्षा जास्त पुढे नेईल. शेअर बाजार आजमावावासा वाटेल. स्वतःच्या पैशांची गुंतवणूक करू नका. प्रेमसंबंधांमुळे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांमध्ये वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अशा भावनांना प्रतिबंध करा. उद्दिष्टपूर्तीवर लक्ष केंद्रित करा. शिक्षणात सातत्य ठेवा, खूप ऊर्जेची गरज लागेल. योगासनांच्या साह्याने आरोग्य सुधारेल.Lucky Color : PinkLucky Number : 7
advertisement
कुंभ (Aquarius) - कामाचा ताण हे भीतीचं कारण ठरू नये. स्वतःला सिद्ध करण्याची संधी म्हणून त्याकडे पाहावं. पगार आणि बचत वाढेल. प्रेमसंबंध टिकण्यासाठी पारदर्शकता ठेवा. कारण गैरसमजांची शक्यता आहे. व्यवसायासाठी कामावर लक्ष केंद्रित करा आणि वचनं पाळा. योग्य दिशेने तयारी केल्यास विरोधकांच्या पुढे जाल. आरोग्यासाठी आराम करा. सध्याचा फिटनेस अधिक सुधारू शकतो.Lucky Color : BlackLucky Number : 2
advertisement
मीन (Pisces) - हा आठवडा शिकण्याचा, विस्तारण्याचा आणि नव्या गोष्टींचा शोध घेण्याचा आहे. सध्या कर्ज घेणं टाळा. कौटुंबिक जीवनात अधिक वेळ व्यतीत करा. 'एक्स'कडून प्रपोझ केलं जाऊन आश्चर्याचा धक्का मिळू शकतो. व्यवसायात इगोमुळे तोटा होऊ शकतो. खेळांसारख्या एक्स्ट्राकरिक्युलर अॅक्टिव्हिटीजमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी अधिक कष्ट घेतल्यास यशाची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी नियमित, सातत्यपूर्ण व्यायाम करा. ताणमुक्त जीवनशैली स्वीकारल्यास आरोग्यासाठी चांगलं राहील.Lucky Color : OrangeLucky Number : 8


