छत्रपती संभाजीनगर : ज्योतिषशास्त्र आणि रत्नशास्त्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. ज्योतिषशास्त्रातही प्रत्येक रत्नाचं वेगळं असं महत्त्व आहे. त्यामुळे अनेकजण राशीनुसार रत्न धारण करत असतात. प्रत्येक यातीलच एक महत्त्वाचं रत्न म्हणजे भैरवाक्ष होय. विशेष म्हणजे भैरवाक्ष रत्नाला हिंदू धर्माप्रमाणेच मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयही पवित्र मानतात. याच रत्नाबाबत छत्रपती संभाजीनगर येथील रत्नशास्त्री प्रकाश पुरवार यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
भैरवाक्ष रत्न हे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मामध्ये वापरलं जातं. हिंदू धर्मामध्ये या रत्नाला भैरवाक्षरत्न म्हणून ओळखलं जात. मुस्लिम धर्मामध्ये याला सुलेमानी हकीक म्हणून ओळखलं जातं. तर ख्रिश्चन धर्मामध्ये 'द स्टोन ऑफ सोलोमन' म्हणून ओळखलं जातं. ग्रीको रोमन काळात भारतामधून या रत्नाची सर्वाधिक निर्यात झाल्याचं सांगितलं जातं. त्यासोबतच इजिप्त मध्ये देखील हे रत्न मिळालेलं आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाईचा नवरात्रोत्सव दणक्यात, पालखीला हजारो भाविकांची मांदियाळी!
काय आहे महत्त्व?
भैरवाक्ष रत्न हे आपल्याला सुरक्षा देणार रत्न म्हणून ओळखलं जातं. ते परिधान केल्यास आपल्याला कोणाची नजर लागत नाही, अशी मान्यता आहे. हे रत्न डोळ्याच्या आकारासारखं असतं. त्यामुळे त्याला भैरवाक्ष म्हणून ओळखलं जातं, असं प्रकाश पुरवार सांगतात. हे रत्न जर तुम्हाला परिधान करायचं असेल तर भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन रात्री 11 ते 3 दरम्यान मंत्र जप करून धारण करावा. यामुळे तुम्हाला फायदा होतो. त्यासोबतच मुस्लिम धर्मामध्येही हे रत्न धारण करण्याची एक पद्धत असल्याचं पुरवार सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





