तात्सुकी यांची पूर्वीची अचूक भाकिते - १९९५ मध्ये रयो तात्सुकीने त्यांच्या डायरीत लिहिले होते की, २५ वर्षांनंतर म्हणजे २०२० मध्ये, एक रहस्यमय विषाणू पसरेल आणि एप्रिलमध्ये तो कहर माजवेल. नंतर थोड्या काळासाठी शांत होईल, परंतु १० वर्षांनी पुन्हा परत येईल. सुरुवातीला कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही, परंतु जेव्हा २०२० मध्ये कोविड-१९ साथीचा आजार पसरला तेव्हा लोकांनी या भाकितावर चर्चा करण्यास सुरुवात केली.
advertisement
२०२५ मध्ये मोठ्या आपत्तीचा इशारा - तात्सुकी यांच्या एका नवीन भाकितानुसार, जुलै २०२५ मध्ये जपानला अतिशय विनाशकारी त्सुनामी येऊ शकते, ती २०११ च्या त्सुनामीपेक्षा तिप्पट मोठी असेल. त्यामुळे या प्रलयाचा आपल्याला अंदाज बांधता येईल, हा येणाऱ्या भयानक आपत्तीचा इशारा आहे. त्यांना एक स्वप्न पडले होते, ज्यामध्ये जपानच्या दक्षिणेकडील समुद्र उकळत होता. काही लोक या दृश्याला समुद्राखालील ज्वालामुखीच्या उद्रेकाचे लक्षण मानत आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात त्सुनामी येऊ शकते. हे संकट जपानपुरते मर्यादित राहणार नाही तर फिलीपिन्स, तैवान, इंडोनेशिया आणि इतर अनेक क्षेत्रांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
आपली रास या 4 राशींमध्ये आहे का? मग नक्की बोटात घाला सोन्याची अंगठी, शुभ परिणाम
या भाकितामुळे भारतातही चिंता वाढली आहे, कारण २६ डिसेंबर २००४ रोजी इंडोनेशियन समुद्री क्षेत्रात भूकंपामुळे भारतातही भयानक त्सुनामी आली होती, ज्यामध्ये दक्षिण भारतातील अनेक भागांना फटका बसला होता.
त्सुनामीची लाट साधी-सुधी नसते, ती आपल्यासोबत विनाश, विस्थापन, आजार आणि मानसिक आघात देखील घेऊन येते. यामुळे हजारो जीव धोक्यात येऊ शकतात. म्हणून, भारतासारख्या देशांनी या संकटाची तयारी करावी, असे सांगितले जात आहे.
पैसा-आदर दोन्ही! मंगळवार या मूलांकाला खुश करणार; रागाचा पारा चढला तर सगळं धुळीस
तात्सुकी यांनी केलेली काही प्रमुख भाकिते -
फ्रेडी मर्क्युरी यांचे १९९१ मध्ये एड्समुळे निधन झाले. १९९५ मध्ये जपानमधील कोबे शहरात झालेल्या विनाशकारी भूकंपाची भविष्यवाणी २०११ मध्ये जपानमध्ये विनाशकारी त्सुनामी या घटना त्यांनी आधीच स्वप्नात पाहिल्या होत्या. वैज्ञानिकदृष्ट्या अशा भाकितांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे योग्य नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, ते हे देखील मान्य करतात की जपान हा भूकंपप्रवण प्रदेश आहे, जो पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये आहे. परंतु, तात्सुकी विधानांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही.