अपघात होण्याची शक्यता - हातावर काही विशिष्ट चिन्ह उमटणं खूप अशुभ मानलं जाते. दुसरीकडे, जर मस्तिष्क रेषेवर लाल डागांचे चिन्ह असेल तर अशा व्यक्तीने वाहनांपासून सावध राहावं. याचा अर्थ अशा लोकांचा अपघात होण्याची शक्यता असते. जर आरोग्य रेषेवर डागांचे चिन्ह असेल तर याचा अर्थ अशा व्यक्तीला काही शारीरिक आजार आहेत. तसेच मानसिक आजार देखील होऊ शकतात.
advertisement
आयुष्यभर संघर्ष करावा लागतो - हस्तरेषाशास्त्रानुसार, तळहातावरील सूर्य रेषा खूप अस्पष्ट किंवा तुटलेली असते, तेव्हा दरिद्र योग तयार होतो. जर शुक्र पर्वतावर शंख किंवा भोवरा चिन्ह असेल तर हा योग तयार होतो. अशा लोकांना जीवनात संघर्ष करावा लागतो. तसेच, हे लोक आयुष्यात अनेक वेळा नोकरी आणि व्यवसाय बदलतात, परंतु यश मिळत नाही.
करिअर आणि व्यवसायात यश मिळत नसतं कारण - जर हातात गुरु आणि राहूच्या रेषा एकमेकांना छेदत असतील तर चांडाळ योग तयार होतो. अशा व्यक्तीला नशिबाची साथ मिळत नाही. सतत त्रासदायक गोष्टींचा सामना करावा लागतो. रोजगारासाठीही खूप संघर्ष करावा लागतो. सतत विविध कामे करूनही यश मिळत नाही. तसेच, ज्या व्यक्तीच्या हातात हा योग असतो त्याला जुगाराचे व्यसन लागते. तसेच, असा व्यक्ती जुगारात आपले सर्व पैसे गमावतो आणि दिवाळखोर होतो.
पैशाची कमतरता असते - हस्तरेषाशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या मनगटावर जाळीचे चिन्ह असेल तर ते शुभ मानले जात नाही. हे चिन्ह व्यक्तीच्या प्रगतीत अडथळा मानले जाते. तसेच अशा व्यक्तीला सतत पैशाची चिंता असते. जीवनात सुखसोयींचा अभाव असतो.
यंदाच्या पितृपक्षात तरी चूक सुधारा! मयत व्यक्तींचे फोटो घरात या दिशेला लावणं शुभ
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)