PitruPaksha 2025: यंदाच्या पितृपक्षात तरी चूक सुधारा! मयत व्यक्तींचे फोटो घरात या दिशेला लावणं शुभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
PitruPaksha 2025: श्राद्ध अशा तिथीला करावं ज्या तिथीला मृत व्यक्तीचे निधन झाले होते. जर तिथी आठवत नसेल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केले जाते. तर्पण करावं यात जल, दूध आणि तीळ यांनी पिंडदान केले जाते, ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे..
मुंबई : हिंदू धर्मात विविध सण, उत्सव, विधी-परंपरा पाळल्या जातात. पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा काळ आहे, तो आपल्या पूर्वजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. पितृपंधरवड्याच्या काळात आपण आपल्या दिवंगत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान यांसारखे विधी करतो.
प्रत्येक व्यक्तीवर देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृ ऋण असते. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितृ ऋणातून मुक्ती मिळते, असे मानले जाते. असे मानले जाते की पितृपक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांना श्राद्ध व पिंडदान अर्पण केल्यास ते तृप्त होऊन आपल्याला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. श्राद्ध विधी हा एका विशिष्ट पद्धतीने केला जातो.
advertisement
श्राद्ध अशा तिथीला करावं ज्या तिथीला मृत व्यक्तीचे निधन झाले होते. जर तिथी आठवत नसेल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केले जाते. तर्पण करावं यात जल, दूध आणि तीळ यांनी पिंडदान केले जाते, ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. पिंडदान करावे, यामध्ये गव्हाच्या पिठाचे किंवा तांदळाच्या पिठाचे पिंड बनवून ते पितरांना अर्पण केले जातात. श्राद्धानंतर ब्राह्मणांना भोजन दिले जाते, त्यामुळे पूर्वज तृप्त होऊन आशीर्वाद देतात असं मानलं जातं. काही ठिकाणी गरीब लोकांनाही अन्नदान केले जाते.
advertisement
मृत व्यक्तींचे फोटो कोणत्या दिशेला लावावे?
वास्तुशास्त्रानुसार मृत व्यक्तींचे फोटो लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. पूर्वजांचा फोटो नेहमीच दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावावे कारण ही दिशा पूर्वजांची मानली जाते. या दिशेला पूर्वजांचा फोटो लावल्यानं त्यांचे आशीर्वाद मिळतात.
advertisement
पूर्वजांचे फोटो कधीही पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेला लावू नयेत. यामुळे शुभ परिणाम मिळत नाहीत, घरात अडचणी निर्माण होतात.
वास्तुशास्त्रानुसार, पूर्वजांचा फोटो कधीही देव-देवतांच्या मूर्तींसोबत लावू नये. याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. तसेच घरात कलहाचे वातावरण निर्माण होते.
याशिवाय, घराच्या बेडरूममध्ये, स्वयंपाकघरात, मुख्य दरवाजात किंवा देव्हाऱ्यात पूर्वजांचे फोटो लावणे टाळावे. असे करणे अशुभ मानले जाते.
advertisement
घराच्या ड्रॉइंग रूममध्ये पूर्वजांचे फोटो लावावे. पूर्वजांचो फोटो वेळोवेळी स्वच्छ करत राहा. त्यावर धूळ साचू देऊ नका. त्याच्यावरील माळ वेळोवेळी बदलत रहा.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 5:20 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
PitruPaksha 2025: यंदाच्या पितृपक्षात तरी चूक सुधारा! मयत व्यक्तींचे फोटो घरात या दिशेला लावणं शुभ