TRENDING:

Budh Gochar 2025: राजयोग नशिबात! फेब्रुवारीत या राशींना मोठा दिलासा; ग्रहांचा राजकुमार दोनदा भाग्यस्थानात

Last Updated:

February Horoscope 2025: फेब्रुवारीमध्ये बुध ग्रह दोनदा आपली राशी बदलणार आहे. बुध 11 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल, तर 27 फेब्रुवारी रोजी बुध मीन राशीत प्रवेश करणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला व्यवसाय आणि बुद्धीचा कारक मानले जाते. फेब्रुवारीमध्ये बुध ग्रह दोनदा आपली राशी बदलणार आहे. बुध 11 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल, तर 27 फेब्रुवारी रोजी बुध मीन राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीवर शनिदेवाचे अधिराज्य असून बुधाचे शनिदेवाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. बुध ग्रहाच्या संक्रमणाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. विशेषत: तीन राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. तसेच, करिअर आणि व्यवसायात प्रगती होई शकते. जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
Budh Gochar 2025: राजयोग नशिबात! फेब्रुवारीत या राशींना मोठा दिलासा; ग्रहांचा राजकुमार दोनदा भाग्यस्थानात
Budh Gochar 2025: राजयोग नशिबात! फेब्रुवारीत या राशींना मोठा दिलासा; ग्रहांचा राजकुमार दोनदा भाग्यस्थानात
advertisement

मिथुन - बुध ग्रहाचे दोनदा भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. कारण एकदा बुध तुमच्या राशीतून भाग्यस्थानात संक्रमण करेल आणि दुसऱ्या वेळी तो कर्मस्थानात संक्रमण करेल. त्यामुळे, या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. मोठे प्रलंबित काम पूर्ण होईल. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. तुमची दूरदृष्टी आणि निर्णय घेण्याची क्षमता कौतुकास्पद असेल. उत्पन्नात अनपेक्षित वाढ होईल. व्यवसायात विस्तार आणि नवीन भागीदारी होण्याची शक्यता असेल. यावेळी, तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तसेच, बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

advertisement

वृषभ - बुध ग्रहाचे दोनदा भ्रमण शुभ ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या राशीच्या कर्मभावात भ्रमण करणार आहे आणि दुसऱ्यांदा उत्पन्न आणि नफा घरात भ्रमण करणार आहे. त्यामुळे, नोकरी शोधणाऱ्या लोकांना या काळात नोकरी मिळू शकते. नोकरी बदलण्याची ही योग्य वेळ आहे. जुन्या प्रकल्पांमध्ये यश मिळाल्याने नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या मोठ्या प्रकल्पांना आता गती मिळेल. तसेच, या काळात व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.

advertisement

अडचणींचा गुंता वाढत चाललाय, धनहानी! घराच्या उत्तरेला सापडेल अचूक उत्तर

मेष - बुधाचे दोन वेळा राशी परिवर्तन या राशींना फायदेशीर ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या गोचर कुंडलीच्या उत्पन्न आणि बाराव्या घरात भ्रमण करणार आहे. त्यामुळे, या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते. अनेक स्रोतांकडून पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. तुमची दूरदृष्टी आणि निर्णय घेण्याची क्षमता कौतुकास्पद असेल. उत्पन्नात अनपेक्षित वाढ होईल. व्यवसायात विस्तार आणि नवीन भागीदारी होण्याची शक्यता असेल. तसेच या काळात तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल.

advertisement

उलटं-पालटं-कुशीवर! झोपण्याची सर्वात आवडती पोजिशन आपल्याविषयी अनेक गोष्टी सांगते

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Budh Gochar 2025: राजयोग नशिबात! फेब्रुवारीत या राशींना मोठा दिलासा; ग्रहांचा राजकुमार दोनदा भाग्यस्थानात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल