Vastu Tips: अडचणींचा गुंता वाढत चाललाय, धनहानी! घराच्या उत्तरेला सापडेल अचूक उत्तर
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञांच्या मते घरातील काही गोष्टी आहेत ज्या उत्तर दिशेला ठेवू नयेत, त्या कोणत्या आहेत त्याविषयी जाणून घेऊया.
मुंबई : घरबांधणीपुरतं वास्तुशास्त्र मर्यादित नाही, त्यामध्ये अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचा तपशीलवार उल्लेख आहे. ब्रह्मदेवानं मानवजातीच्या कल्याणासाठी वास्तुशास्त्राची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. यामध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यास घरामध्ये तयार झालेले वास्तुदोष आणि जीवनातील नकारात्मकता दूर होऊ शकते. आयुष्यात अशा काही समस्या येऊ लागतात, त्यामागील कारण समजणे कठीण असते. त्याचे कारण कदाचित वास्तुदोष असू शकते.
ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञांच्या मते घरातील काही गोष्टी आहेत ज्या उत्तर दिशेला ठेवू नयेत, त्या कोणत्या आहेत त्याविषयी जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला डस्टबिन ठेवू नये. असे केल्याने डस्टबिन नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करते. याशिवाय घरातील लोकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होते.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या खिडक्याही उत्तर दिशेला नसाव्यात. ती दिशा खिडक्यांसाठी अशुभ मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला शौचालय नसावे. जर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला शौचालय असेल तर ते शिफ्ट करा किंवा वापरणे बंद करा. उत्तर दिशेला शौचालय असल्याने अस्वस्थता निर्माण होते.
advertisement
वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला पुस्तके कधीही ठेवू नयेत. धार्मिक मान्यतेनुसार, या दिशेला पुस्तकांच्या वजनामुळे पृथ्वीमधून निघणारी एनर्जी ब्लॉक होते. त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप वाढतो. त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या मालमत्तेवरही दिसून येतो. अशा वजनदार वस्तू ठेवण्यासाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा उत्तम मानली जाते.
advertisement
वास्तुशास्त्रानुसार जड फर्निचरही उत्तर दिशेला ठेवणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळेही पृथ्वीतून बाहेर पडणारी ऊर्जा अवरोधित केली जाते. त्यामुळे वजनाचे फर्निचर उत्तर दिशेला ठेवणे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये उत्तर दिशेला पंखे लावू नयेत. पंखा उत्तर दिशेला लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 15, 2025 11:11 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: अडचणींचा गुंता वाढत चाललाय, धनहानी! घराच्या उत्तरेला सापडेल अचूक उत्तर