मूलांक 1 साठी बुधादित्य योग कसा असणार?
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 1 असतो. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. बुधादित्य योगात सूर्याची शक्ती वाढते, त्यामुळे मूलांक 1 च्या लोकांसाठी हा काळ 'गोल्डन टाइम' ठरू शकतो. या काळात नोकरीत असलेल्यांना पदोन्नती मिळण्याचे प्रबळ योग आहेत. तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. तर रखडलेले पैसे परत मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमच्या आत्मविश्वासात आणि निर्णयक्षमतेत वाढ होईल, ज्यामुळे कठीण कामेही सहज पूर्ण होतील. जर तुमचे सरकारी काम अडकले असेल, तर या काळात ते पूर्ण होऊ शकते.
advertisement
'या' राशींसाठी बुधादित्य योग ठरेल लकी
सिंह : सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य आहे. बुधादित्य योगामुळे तुमच्या मान-सन्मानात मोठी वाढ होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल.
मिथुन : बुधादित्य योग मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक समृद्धी घेऊन येईल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे.
कन्या : कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरीत नवीन संधी मिळतील. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही कठीण प्रसंगांतून मार्ग काढाल.
धनु : हा योग धनु राशीतच होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी आत्मविकासाची मोठी संधी आहे. परदेशी जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
'या' राशींवर होऊ शकतो नकारात्मक परिणाम
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा गोंधळाचा असू शकतो. वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांचा परिणाम तुमच्या प्रोफेशनल लाइफवर होऊ शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना आव्हानात्मक ठरू शकतो. कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. घाईघाईत कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत.
मीन : मीन राशीच्या व्यक्तींना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. शत्रू पक्षापासून सावध राहावे आणि संवादात स्पष्टता ठेवावी.
बुधादित्य योगाचा लाभ घेण्यासाठी करा 'हे' उपाय
- दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा.
- 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' किंवा 'ॐ आदित्याय नमः' या मंत्राचा जप करा.
- बुधवारी हिरव्या वस्तूंचे आणि रविवारी गूळ किंवा गव्हाचे दान करा.
