रात्री 9.57 वाजता ग्रहण स्पर्श झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस व मंदिरातील इतर परिवार देवतेस चंद्रभागा नदीचे पाणी आणून स्नान घालण्यात येणार आहे. तसेच ग्रहण सुटेपर्यंत म्हणजे रात्री 1.37 वाजेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू राहणार आहे.
ग्रहण सुटल्यानंतर ग्रहण सुटल्याचे स्नान चंद्रभागे नदीचे पाणी आणून घालण्यात येणार असून मोक्ष झाल्यानंतर रात्री 2.00 वाजेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू राहील, त्यानंतर रात्री 2.00 वाजेनंतर शेजारती करण्यात येणार आहे. शेजारतीनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची विश्रांती पहाटे 5.00 वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे दिनांक 8 सप्टेंबर रोजी काकड आरती पहाटे 5.00 नंतर सुरू होईल व त्यानंतर नेहमीप्रमाणे नित्यपूजा होऊन दर्शन सकाळी 6.30 वाजेपर्यंत सुरू होईल याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
advertisement
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणांना विशेष महत्त्व आहे. ही एक खगोलीय घटना असली, तरी तिचा मानवी जीवनावर आणि राशींवर परिणाम होतो, असे मानले जाते. हे ग्रहण कुंभ राशीत आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात होत आहे, ज्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हे महत्त्वाचे मानले जाते. या काळात काही राशींसाठी धनलाभ आणि शुभ कार्याचे योग आहेत, तर काही राशींसाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
सकाळ, दुपार, संध्याकाळ! विसर्जनासाठी गणेश मूर्ती जागेवरून हलवण्याचा शुभ मुहूर्त
ग्रहणाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार वेगळा असतो. काही राशींना फायदा होतो, तर काहींना सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण काळात जप, तप, दान आणि मंत्रोच्चार करणे शुभ मानले जाते. विशेषतः चंद्र आणि राहु मंत्रांचा जप करणे फायदेशीर ठरते. तसेच, ग्रहणानंतर स्नान करून दानधर्म केल्याने त्याचे अशुभ परिणाम कमी होतात, असे मानले जाते. सुतक काळात धार्मिक कार्य, मूर्ती स्पर्श, खाणे-पिणे आणि झोपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. गर्भवती महिलांनी विशेषतः सावधगिरी बाळगावी. सुतककाळात गर्भवती स्त्रियांनी चंद्र मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.