पुराणांमध्ये सांगितल्यानुसार एकादशीचं व्रत केल्यानं मनुष्य जन्म-मरणाच्या बंधनातून मुक्त होतो आणि त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. डिसेंबर महिन्यात तीन एकादशी येण्याचं कारण जाणून घेऊ. एकादशी ही विष्णूची अत्यंत प्रिय तिथी मानली जाते. मनोभावे केलेली एकादशी पापांचं नाश करते, मोक्षमार्ग दाखवते आणि मनातील सात्त्विकता वाढवते. काही पुराणांमध्ये असं वर्णन आहे की, एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केल्याने हजारो यज्ञांच्या तुल्य पुण्य मिळतं.
advertisement
हा दिवस पितरांसाठीही विशेष आहे. ज्यांना मोक्ष मिळालेला नसतो, त्यांच्यासाठी या दिवशी काळे तीळ पाण्यात मिसळून दक्षिणेकडे तोंड करून तर्पण केल्याने पितरांना मोक्ष मिळतो. एकादशीचं व्रत केल्याने जन्मजन्मांतरातील पाप नष्ट होतात. मनुष्य मोक्षप्राप्तीच्या मार्गावर जातो आणि वैकुंठ प्राप्त होतो. या व्रताचा फायदा फक्त व्रतधारीलाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही होतो. ग्रह-नक्षत्रांचे अशुभ परिणामही कमी होतात.
डिसेंबरमध्ये तीन एकादशी का आहेत?
या महिन्यात खरमास सुरू होत आहे. खरमास म्हणजे सूर्य गुरुच्या धनु किंवा मीन राशीत प्रवेश करताना येणारी एक विशेष अवधि. या काळात शुभ-मांगलिक कार्ये होत नाहीत. खरमास वर्षातून दोनदा येतो, एकदा मार्चमध्ये आणि एकदा डिसेंबरमध्ये. या वर्षी खरमासाची सुरुवात 16 डिसेंबरपासून होईल आणि 14 जानेवारी 2026 रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करताच समाप्त होईल. खरमासाच्या काळात जप, तप, दान आणि व्रतांना खूप महत्त्व असतं. याच कारणाने डिसेंबर महिन्यात तीन एकादशींचे व्रत येत आहेत.
तीन एकादशी तिथी
1 मोक्षदा एकादशी व्रत 2025
(पितरांच्या मोक्षासाठी अत्यंत शुभ तिथी)
तारीख: 1 डिसेंबर 2025 (सोमवार)
2 सफला एकादशी व्रत 2025
तारीख: 15 डिसेंबर 2025 (सोमवार)
सफला म्हणजे यश. या दिवशी व्रत केल्याने अडलेली कामं सुरू होतात आणि मनातील नकारात्मकता दूर होते.
3 पुत्रदा एकादशी व्रत 2025 (खरमास)
तारीख: 30 डिसेंबर 2025 (मंगळवार)
पुत्रदा एकादशी खास करून संततीची इच्छा असणाऱ्या दांपत्यांसाठी विशेष फलदायी मानली जाते.
थोडं थांबा, 16 डिसेंबरपासून या राशींचे दिवस सुरू; लॉस व्याजासहित निघणार भरून
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
