हे रोपटं घरातली सकारात्मक ऊर्जा वाढवतं आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत करतं. याच कारणामुळे अनेक लोक हे रोपटं घर किंवा ऑफिसमध्ये लावणं शुभ मानतात.
क्रसुला रोपट्याची खासियत - क्रसुला हे रोपटं त्याच्या जाड, मखमली आणि गडद हिरव्या पानांमुळे सहज ओळखता येतं. वास्तुशास्त्रानुसार याची पानं ऊर्जा खेचून घेण्याचं प्रतीक मानली जातात. धार्मिक मान्यतेनुसार, हे रोपटं सकारात्मक ऊर्जेला घराकडे आकर्षित करतं. जसं चुंबक लोखंडाला स्वतःकडे ओढतं, तसंच हे रोपटं धन आणि समृद्धीच्या संधींना आकर्षित करण्यासाठी मदत करतं असं म्हणतात.
advertisement
योग्य दिशा माहिती असणं -
वास्तुशास्त्रात कोणत्याही गोष्टीचा पूर्ण फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा ती योग्य दिशेला ठेवली जाते. क्रसुलाच्या बाबतीत सुद्धा दिशा महत्त्वाची आहे. वास्तुशास्त्रानुसार हे रोपटं घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवणं सगळ्यात शुभ मानलं जातं. असं म्हणतात की मुख्य दरवाजावर ठेवलेलं हे रोपटं घरात येणारी नकारात्मक ऊर्जा रोखतं. हे रोपटं ऑफिसमध्ये किंवा कामाच्या टेबलावर (Desk) ठेवल्यामुळे व्यापारात प्रगती आणि नोकरीत प्रमोशन मिळण्याचे योग येतात अशी मान्यता आहे. मात्र, धार्मिक मान्यतेनुसार याला दक्षिण दिशेला ठेवू नये, कारण त्याचे उलट परिणाम मिळण्याची भीती असते.
देखभाल करणं आहे एकदम सोपं -
क्रसुलाची एक मोठी सोय म्हणजे याची देखभाल करणं लय सोपं असतं. याला खूप जास्त पाणी किंवा विशेष खताची गरज नसते. या रोपट्याला रोज पाणी देण्याची गरज नाही. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा पाणी देणं पुरेसं असतं. हे रोपटं सावलीत सुद्धा चांगलं वाढतं, त्यामुळे तुम्ही याला घराच्या आत आरामात ठेवू शकता.
मोबाईल नंबरच्या शेवटचे अंक प्रगतीच्या मार्गातील काटे? जन्मतारखेनुसार लकी कनेक्शन
हिरवीगार पानं मानली जातात शुभ -
वास्तुशास्त्रानुसार क्रसुलाची पानं जेवढी हिरवीगार आणि टवटवीत राहतील, तेवढीच घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे झाडाला चांगलं ठेवणं महत्त्वाचं आहे. जर हे रोपटं सुकायला लागलं किंवा त्याची पानं कोमेजली, तर वास्तुशास्त्रानुसार ते लगेच काढून टाकावं. कारण कोमेजलेलं झाड प्रगतीत अडथळा ठरू शकतं असं मानलं जातं.
आर्थिक चणचण दूर - एखादा माणूस खूप दिवसांपासून पैशांच्या अडचणीत असेल किंवा कर्जाच्या ओझ्याखाली असेल, तर क्रसुला घरात लावणं शुभ मानलं जातं. हे रोपटं फक्त पैसा खेचून आणत नाही, तर कुटुंबातल्या माणसांमध्ये प्रेम आणि चांगलं वातावरण टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतं अशी पारंपरिक श्रद्धा आहे.
