लकी नंबर: 8, लकी कलर: फिकट निळा
मूलांक 2 -
आज तुम्ही लोकांमध्ये खूप लोकप्रिय असाल. पण आज तुम्हाला तुमचा राग आवरताना मोठी कसरत करावी लागेल. व्यवसायात स्पर्धकांशी सुरुवातीला थोडे खटके उडू शकतात, पण शेवटी निकाल तुमच्याच बाजूने लागेल. नात्यात सध्या तुम्ही गंभीर कमिटमेंट करायला तयार नाही आहात असं वाटतंय; कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा.
advertisement
लकी नंबर: 6, लकी कलर: गोल्डन ब्राऊन
मूलांक 3 -
कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यासाठी अडचणी उभ्या करू शकतात. आईपासून लांब जाण्याचे योग येऊ शकतात. बऱ्याच दिवसांच्या तणावानंतर आज तुम्हाला फ्रेश आणि उत्साही वाटेल. परदेशातून पैशांच्या बाबतीत एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रेमात तुम्हाला केवळ शारीरिक आकर्षण नको असून भावनिक जवळीक हवी असेल.
लकी नंबर: 2, लकी कलर: पांढरा
मूलांक 4 -
आजचा दिवस तुमच्या यशाचा आणि आनंदाचा आहे. तुमची राहणीमान आणि रुबाब पाहून मित्रमंडळी प्रभावित होतील. त्वचेची काही समस्या जाणवली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज तुम्ही चांगले पैसे कमावाल, पण खर्चही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कराल; कठीण काळासाठी बचत करण्याचा विचार करा. तुमच्या 'भाव खाण्याच्या' पद्धतीमुळे समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल.
लकी नंबर: 15, लकी कलर: लाल
कधी केव्हाची गोष्ट अनपेक्षित फळ देणार! 3 राशींचे लोक आनंदाने उड्या मारतील
मूलांक 5 -
वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही आणि मिळणारा फायदा लांबणीवर पडू शकतो. तरीही तुम्ही आज खूप आनंदी आणि उत्साही असाल. घराच्या सुरक्षेची काळजी घ्या, दारे नीट लावून ठेवा; सावध राहिलेले कधीही चांगले. भविष्यातील व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आजचा दिवस नियोजनासाठी उत्तम आहे. जोडीदार तुमच्या भावना समजून घेण्याच्या मनस्थितीत नसेल, त्यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा.
लकी नंबर: 17, लकी कलर: पोपटी
मूलांक 6 -
तुमची चांगली जनप्रतिमा आणि सामाजिक ओळखीमुळे समाजात तुम्हाला मानाचे स्थान मिळेल. तुम्हाला हवी असलेली माहिती किंवा ज्ञान मिळण्याची संधी लाभेल. आज सतर्क राहा, तुमची एखादी महत्त्वाची वस्तू हरवू नये याची काळजी घ्या. यश मिळवण्यासाठी आज थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. नात्यात सध्या थोडा तणाव जाणवू शकतो.
लकी नंबर: 7, लकी कलर: पीच
मूलांक 7 -
तुम्ही जे काही ठरवाल ते पूर्ण कराल, आज नशिबाची साथ मिळेल. तुमच्या राहणीमानाचा प्रभाव इतरांवर पडेल. डोळ्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नोकरीत बढती किंवा पगारवाढीची अपेक्षा करू शकता. लग्नाची तारीख ठरवण्यासाठी आजचा दिवस खूप छान आहे.
लकी नंबर: 7, लकी कलर: मरून
मूलांक 8 -
अधिकार किंवा पद मिळवण्यासाठी स्पर्धा करायला हा काळ उत्तम आहे. मुलांच्या बाबतीत एखादी बातमी तुमच्या उत्साहावर विरजण घालू शकते. चोरी किंवा नुकसान टाळण्यासाठी घराची सुरक्षा नीट तपासा. काही कारणांमुळे आज फायदा मिळायला उशीर होऊ शकतो. प्रेम प्रकरणाला सुरुवातीला थोडा नकार मिळेल, पण नंतर प्रतिसाद सकारात्मक असेल.
लकी नंबर: 11, लकी कलर: लिंबू पिवळा
खडे-रत्नांच्या अंगठ्या बोटात घालणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? कमावलेलं सगळं..
मूलांक 9 -
वरिष्ठांशी संबंधित तुमची कामं आज यशस्वीपणे पूर्ण होतील. आईसोबतचे संबंध अतिशय प्रेमळ राहतील. जर तुमची मालमत्ता भाड्याने दिलेली असेल, तर भाडे वसुलीत काही अडचणी येऊ शकतात. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे तुमचा कल राहील. लग्नाबाहेरील आकर्षणापासून लांब राहा, अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.
लकी नंबर: 1, लकी कलर: फिकट पिवळा
