TRENDING:

Numerology: बुधवार लकी! या 3 मूलांकावर अनपेक्षित गणेश कृपा; कोणाला एक चूक महागात पडणार?

Last Updated:

Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 17 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
News18
News18
advertisement

बुधवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. ठरवलेली नियोजित कामं पूर्ण करू शकाल. व्यावसायिकांसाठी दिवस फायद्याचा आहे. भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. नोकरदारांसाठी दिवस त्रासदायक असेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयमाने काम करा. घरात दिवस आनंदात जाईल. आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील.

advertisement

नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे श्री गणेश सांगतात,भविष्य तुम्हाला लागू होतं.)

बुधवारचा दिवस अनेक कामांसाठी अनुकूल आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो, कित्येक दिवसांपासून रखडलेले पैसे परत मिळतील. घरात सगळे आनंदी असाल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. भावनेच्याभरात निर्णय घेणं टाळा. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. जोडीदाराशी असलेलं नातं अधिक घट्ट होईल. कामांमध्ये यश मिळतं.

advertisement

नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

बुधवारचा दिवस आपणास फायदेशीर आहे. हुशारीनं कामात निर्णय घ्याल. पैशाच्या दृष्टीकोनातून दिवस चांगला आहे. कुठूनतरी अचानक पैसे मिळाल्यानं खुश व्हाल. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. कुटुंबातील लोकांशी समन्वय ठेवून काम करा, जोडीदाराशी नातं घट्ट होईल. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा विचार कराल.

advertisement

नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

बुधवारचा दिवस 4 मूलांक असलेल्यांसाठी प्रतिकूल आहे. नाहक अडचणींचा सामना करावा लागेल. तुमची आणि तुमच्या वडिलांची तब्येत थोडी बिघडू शकते. जीवनशैलीशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात. त्यामुळे तुमची चिंता वाढेल. आर्थिक बाबतीत विचार करता, पैशाची आवक अचानक थांबू शकते. कौटुंबिक दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.

advertisement

नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस व्यवसायासाठी अनुकूल असेल. पैशांची आवक अचानक वाढेल, तुम्ही तुमची कामं हुशारीने पूर्ण कराल. यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल. सकारात्मक विचारांमुळे आर्थिक लाभ मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यांकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.

नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

बुधवारचा दिवस मध्यम फळदायी असेल. कुटुंबात एखाद्या नातेवाईकाबाबत एखादी दुःखद घटना घडू शकते. त्यामुळे आपण चिंतेत असाल. तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करू शकता. कौटुंबिक दृष्टीकोनातून दिवस चांगला असेल. कुटुंबासाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित कराल. जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून वाद होतील, त्यामुळे तुम्ही शांत रहा. वाद वाढवू नका.

नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

बुधवारचा दिवस अडचणी वाढवणारा, प्रतिकूल असेल. कामात अडचणी येतील. दिवसाच्या सुरुवातीला तुमचे विचार सकारात्मक असतील. पण हे विचार दिवसभर टिकू शकणार नाहीत. स्वभाव अहंकारी होऊ देऊ नका. सर्वांशी प्रेमानं आणि चांगलं वागलात तर दिवस चांगला जाईल. ऑफिसमध्ये एखाद्याशी वाद होतील. संयमाने वागा. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे. पैशाचा योग्य वापर करा. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.

नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

बुधवारचा दिवस बरा आहे. कुटुंबातील अंतर्गत बाबींमुळे चिंतेत असाल. त्यामुळे अस्वस्थता जाणवेल. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेऊन पैसे गुंतवले तरच आर्थिक फायदा मिळू शकतो. कुटुंबातील समस्यांमुळे सदस्याशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी योग्य समन्वय नसेल.

यंदाच्या पितृपक्षात तरी चूक सुधारा! मयत व्यक्तींचे फोटो घरात या दिशेला लावणं शुभ

नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

बुधवारचा दिवस चांगला असेल. शांतपणे सर्व कामं पूर्ण कराल. तुम्ही उत्साही असाल. पण रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. उगाच चिडचिड केल्यानं कामात अडचणी येऊ शकतात. आर्थिक लाभ होऊ शकतो. हा कर्मचारी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक पातळीचा विचार करता दिवस सामान्य आहे. कुटुंबीयांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. जोडीदाराविषयी बोलताना तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग येऊ शकतो. वाद नको शांत राहण्याचा प्रयत्न करा.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: बुधवार लकी! या 3 मूलांकावर अनपेक्षित गणेश कृपा; कोणाला एक चूक महागात पडणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल