TRENDING:

Numerology: चंद्रग्रहणातही या 4 मूलांकाना नो टेन्शन! रविवारी दुहेरी फायद्यात असणार, धनलाभ

Last Updated:

Numerology 07 September 2025: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 07 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मूलांक 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
News18
News18
advertisement

आज रविवारी जे काही काम हाती घ्याल, ते पूर्ण करण्यासाठी संयम आणि दृढनिश्चय महत्त्वाचा ठरेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आणि समाधानी जाईल. लोकांशी संवाद साधणं फायदेशीर ठरेल. आर्थिकदृष्ट्या सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या दृष्टीने विश्रांती घ्या. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराला थोडा वेळ द्या. सहलीला जाण्याचा प्लॅन करू शकता.

Lucky Colour : Sea Green

advertisement

Lucky Number 15

मूलांक 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज रविवारी कुटुंबात किंवा जवळच्या मित्रासोबतचे नातेसंबंध ताणले जातील. मुलांमुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. आरोग्य समस्या उद्भवल्यास लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. तुमचा जोडीदार तुमचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरेल.

advertisement

Lucky Colour : Purple

Lucky Number : 4

मूलांक 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

वादाचे प्रसंग आले तरी त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. मुलांकडून वाईट बातमी मिळू शकते. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. घरातला खर्च वाढेल; पण काळजी करू नका, त्या तुलनेत उत्पन्नदेखील वाढेल. तुमच्या जोडीदाराशी नातं अधिक दृढ होईल.

advertisement

Lucky Colour : Light Blue

Lucky Number : 22

मूलांक 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आपली वाट बदलू नका, तुम्ही वाईट व्यक्तींच्या संगतीत आल्यामुळे तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. घरात प्रेमानं संवाद साधा, फायदेशीर ठरेल. तुमचे विरोधक वेगानं प्रगती करीत आहेत, अशा परिस्थितीत आत्मसंतुष्ट होऊ नका. अचानक धनलाभ होईल. प्रेमाच्या बाबतीत दिवस चांगला नाही, काळजी घ्या.

advertisement

Lucky Colour : Lemon

Lucky Number : 9

मूलांक 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज पुन्हा कुटुंबात संबंध ताणले जातील. मित्रांसोबत जुन्या आठवणींना उजाळा द्याल. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा चांगली राहील. आर्थिक व्यवहार करण्यासाठी चांगली वेळ आहे. जोडीदाराला वेळ द्या, फायद्याचं ठरेल. मनाला शांती मिळेल.

Lucky Colour : Navy Blue

Lucky Number : 15

मूलांक 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.

सगळीकडून चांगल्या बातम्या समजतील, त्यानं आज तुमचा मूड चांगला राहील. पण दिवसभर थकवा जाणवू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नात चढउतार राहतील. भाग्य तुमच्यासोबत राहील. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराशी असणाऱ्या नात्यात दुरावा येत आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्णय घ्या.

Lucky Colour : Forest Green

Lucky Number : 17

मूलांक 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज कामामध्ये वरिष्ठांची मदत होईल. घरात सर्वांशी प्रेमानं वागा, फायद्याचं ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला थकवा जाणवेल, काळजी घ्या. नशीब आणि कठोर परिश्रमानं यश मिळेल. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराकडून तुमच्या भावनिक आणि बौद्धिक गरजाही पूर्ण होतील.

Lucky Colour : Parrot Green

Lucky Number : 5

या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहण पाहू नये; अघटित घडण्याची भीती, संकट ओढावेल

मूलांक 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

मूड चांगला राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मनामध्ये असंतोषाची भावना राहील. आज तुम्ही सावध न राहिल्यास तुमची एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. उत्पनाच्या तुलनेच खर्च जास्त होईल. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस जोडीदारासोबत आनंदात जाईल. अविस्मरणीय आठवणी तयार होतील.

Lucky Colour : Light Red

Lucky Number : 22

मूलांक 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

भावंडांशी आता नातं सुधारेल. नाहक वादात आज पडू नका. तुमच्या धाडसाचं कौतुक होईल. ऑफिसमध्ये तुम्हाला कोणी तरी बदनाम करण्याचा प्रयत्न करील, सावधगिरी बाळगा. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात, काळजी घ्या.

Lucky Colour : Crimson

Lucky Number : 6

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: चंद्रग्रहणातही या 4 मूलांकाना नो टेन्शन! रविवारी दुहेरी फायद्यात असणार, धनलाभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल