२०२५ मध्ये देवउठनी एकादशी कधी आहे?
हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९ वाजून ११ मिनिटांनी सुरू होऊन २ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७ वाजून ३१ मिनिटांपर्यंत राहील. १ नोव्हेंबरला एकादशी तिथी दिवसभर असल्यामुळे १ नोव्हेंबर रोजीच देवउठनी एकादशी साजरी केली जाईल.
देवउठनी एकादशीचे व्रत करणे आणि या दिवशी भगवान विष्णू व माता पार्वतीची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. यामुळे जीवनात सुख-समृद्धी येते आणि मनोकामना पूर्ण होतात. यावर्षी देवउठनी एकादशीचे पारण (व्रत सोडणे) २ नोव्हेंबर रोजी केले जाईल. .
advertisement
प्यार में...! A अक्षरानं नाव सुरू होणारे असेच असतात; प्रेमात यांच्यासोबत नेहमी
दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह - देवउठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला भगवान विष्णूचे अवतार भगवान शालिग्राम आणि देवी तुळस यांचा विवाह लावला जातो. यावर्षी तुळशी विवाह २ नोव्हेंबर रोजी होईल.
देवउठनी एकादशी पूजा विधी - देवउठनी एकादशीच्या एक दिवस आधी (संध्याकाळी) सात्विक भोजन करा आणि ब्रह्मचर्याचे पालन करा. त्यानंतर एकादशीच्या सकाळी लवकर उठून स्नान करा. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. नंतर भगवान विष्णूचे ध्यान करत एकादशी व्रताचा संकल्प घ्या. यानंतर पूजास्थळ स्वच्छ करा आणि गंगाजल शिंपडा. एका चौरंगावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापन करा. मूर्तीला गंगाजलाने स्नान घाला. पिवळे चंदन, अक्षत अर्पण करा. फळे, मिठाई, तुळशीचे पान (तुळशी दल) आणि पंचामृतचा नैवेद्य दाखवा. धूप-दीप लावा. एकादशी व्रताची कथा ऐका. भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा. शेवटी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आरती करा.
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
