सर्वपित्री अमावस्येला दान का करावे?
सर्वपित्री अमावस्येचा सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंतचा वेळ अत्यंत शुभ मानला जातो. अर्पण आणि दानाद्वारे प्रथम पूर्वजांना शांत केले जाते आणि नंतर त्यांना निरोप दिला जातो. त्यानंतर, उर्वरित दिवस धर्मादाय कार्यात घालवला जातो. सर्वपित्री अमावस्येला दान केल्यानं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, ज्यामुळे कुटुंबात आनंद, शांती आणि आर्थिक समृद्धी येते, असे मानले जाते. पूजा आणि दान केल्यानं वर्षभर कुटुंबावर आणि घरावर पूर्वजांचा आशीर्वाद राहतो.
advertisement
सर्वपितृ अमावस्येला काय दान करावे -
तीळ दान करा - पांढरे आणि काळे तीळ दान करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे पूर्वजांना शांती मिळते.
खीर आणि गोड प्रसाद तयार करा आणि त्याचे दान करा. स्वच्छ पद्धतीने खीर, हलवा आणि मिठाई तयार करून आणि लोकांना दान करून, पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात.
दसऱ्यापासून या 5 राशींचा गोल्डन टाईम येणार; करिअर-व्यवसायात मोठी उसळी, सुख
धान्य, डाळी दान करा - गरजूंना तांदूळ, उडीद डाळ, गहू, हिरवे मूग किंवा मसूर डाळ दान करा. यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही.
सुकामेवा आणि हंगामी फळे दान करा - बदाम, मनुका, काजू आणि हंगामी फळे दान करा. तुम्हाला चांगले आरोग्य आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतील.
कपडे दान करा - स्वच्छ कपडे दान करा. कपडे दान केल्यानं पूर्वज प्रसन्न होतील. सर्वपितृ अमावस्येला गरिबांना पैसे दान केल्याने आर्थिक आणि मानसिक समस्या दूर होतात.
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक असणं चंचलतेचं कारण? प्रगती साधतात पण...
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)