TRENDING:

Name Astrology: इंग्रजी 'A' अक्षरानं नावाची सुरुवात होते? असे गुण-दोष तुमच्यात नक्की असणार

Last Updated:

Name Astrology: आपल्या नावाच्या अक्षरांवरून आपल्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये देखील कळतात. A अक्षर कृतिका नक्षत्रात येतं, ते सूर्याचे नक्षत्र आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपलं नाव कोणत्या अक्षरानं सुरू होतं, याला महत्त्व आहे. नावाच्या सर्व अक्षरांची वेगळी खासियत आहे. नावाच्या पहिल्या अक्षरानुसार ग्रह-नक्षत्रांची शक्ती मिळत असते. आपल्यापैकी कोणाचे नाव 'अ' ने म्हणजे ‘A’ अक्षराने सुरू होत असेल तर त्यातही विशेष ऊर्जा असते. ही ऊर्जा आपल्याला जीवनातील निर्णय घेण्यास खूप मदत करते. आपल्या नावाच्या अक्षरांवरून आपल्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये देखील कळतात.
News18
News18
advertisement

A अक्षर कृतिका नक्षत्रात येतं, ते सूर्याचे नक्षत्र आहे. राशीबद्दल सांगायचे झाल्यास A नावाचे लोक मेष राशीच्या अधिपत्या खाली येतात. त्यांचा स्वामी मंगळ देव असतो. त्यांची देवता अग्नी आहे, म्हणूनच या लोकांमध्ये खूप ऊर्जा असते.

A नावाच्या लोकांचे व्यक्तिमत्व कसे असते?

ज्योतिषी ममता यांच्या मते, ज्या लोकांचे नाव 'अ' अक्षराने सुरू होते ते खूप बुद्धिमान, तेजस्वी, प्रामाणिक, प्रेमळ, दयाळू आणि प्रभावशाली असतात. अशा लोकांमध्ये अहंकाराची शक्ती असते. या लोकांना सर्जनशील कामात रस असतो आणि ते कोणत्याही कामाच्या मुळापर्यंत पोहोचण्यास तयार असतात. हे लोक कष्टकरी असतात आणि म्हणूनच ते अधिक महत्त्वाकांक्षीही असतात.

advertisement

नोकरी-व्यवसाय -

‘अ’ अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक सरकारी नोकरीच्या क्षेत्रात जास्त दिसतात. हे लोक तज्ञ म्हणून काम करतात. प्रत्येक गोष्टीचे नियोजन करण्याच्या गुणवत्तेमुळे हे लोक अशा क्षेत्रात दिसतात. उदाहरणार्थ, ते वकील, शास्त्रज्ञ आणि व्यापारी बनतात.

प्रेमजीवन -

'अ' अक्षरानं नाव सुरू होणारे लोक त्यांच्या आयुष्याचे उत्तम नियोजना करतात. त्यांना त्यांचा जोडीदार स्वतःला निवडायचा असतो. जर त्यांना त्यांच्या उर्जेशी जुळणारे कोणी सापडले तरच ते लगेच नातेसंबंध जोडतात. हे लोक नेहमी खरं प्रेम शोधतात. त्यांना नात्यात खोटेपणा अजिबात आवडत नाही.

advertisement

घरी एकादशीची पूजा या स्तोत्र-आरतीविना अपूर्ण; पठणाचे शुभ परिणाम मिळतात

A ने नाव सुरु होणाऱ्या लोकांमध्ये सर्वात वाईट गोष्ट कोणती?

A अध्याक्षराचे लोक कधीकधी फक्त स्वतःची काळजी घेऊ लागतात. त्यांना इतरांचे ऐकणे आवडत नाही. याशिवाय आपणच बरोबर आहे, असा त्यांचा हट्ट असतो. बऱ्याचदा त्यांचा अतिआत्मविश्वास अहंकारात बदलतो.

advertisement

हे काम अवश्य करावे -

ज्योतिषी ममता सांगतात की, A अक्षरानं नावाची सुरुवात होणाऱ्या लोकांनी रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांची पूजा करावी. याशिवाय आदित्यहृदय स्रोताचा पाठही करावा.

बऱ्याच काळापासूनचं टेन्शन दूर! 4, 13, 22, 31 या जन्मतारखा असणाऱ्यांना खुशखबर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Name Astrology: इंग्रजी 'A' अक्षरानं नावाची सुरुवात होते? असे गुण-दोष तुमच्यात नक्की असणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल