Numerology: बऱ्याच काळापासूनचं टेन्शन दूर! 4, 13, 22, 31 या जन्मतारखा असणाऱ्यांना खुशखबर
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Today Numerology in Marathi 25 January 2025: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 25 जानेवारी 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज प्रसिद्ध मिळेल, ती डोक्यात जाऊ देऊ नका. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दिवस परीक्षा पाहणारा असेल. या काळात आरोग्याची काळजी घ्या. बिझनेस स्ट्रॅटेजी निश्चित करण्यासाठी अनेक पर्यायांची चाचपणी करून पाहायला हवी. कष्टांचं फळ मिळेल.
Lucky Number : 4
Lucky Colour : Blue
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
अखेर कामाची दखल घेतली जाईल. तुम्ही आनंदी आणि समाधानी आहात. दिवस यशाचा आहे. डोकेदुखीची शक्यता आहे. रिलॅक्स व्हा. अधिक कष्ट घेतल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. थोड्याशा फ्लर्टिंगने सुरू झालेलं नातं अधिक अर्थपूर्ण होईल.
Lucky Number : 6
Lucky Colour : Violet
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
उच्चपदस्थ अधिकारी सहकार्य करणारे आहेत. तुम्ही आनंदी आणि समाधानी आहात. कारण दूरवरून झालेला संवाद आकर्षक ठरतो आहे. डोकेदुखी होऊ शकते. रिलॅक्स व्हा. कामात आलेला व्यत्यय हा काम पूर्ण होण्यातला मोठा अडथळा ठरेल. सुरुवातीच्या काही अडथळ्यांनंतर रोमान्स सुरळीत असेल.
Lucky Number : 11
Lucky Colour : Lavender
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
सकारात्मकता आणि स्वतःबद्दलचा विश्वास यांमुळे दिवस पुढे ढकलला जाईल. आज महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क साधाल. बऱ्याच काळाच्या टेन्शननंतर तुम्हाला आज ऊर्जावान वाटेल. तुमचा आकर्षकपणा काम करू लागेल. आर्थिक परिस्थिती चांगली आहे. बुध ग्रह अशा स्थितीत नेईल, की तुम्ही तुमची कर्जं फेडू शकाल. आक्रमक जोडीदारामुळे ताण येऊ शकतो.
Lucky Number : 4
advertisement
Lucky Colour : Pink
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमच्या आकर्षकपणाचा उपयोग नवे मित्र बनवण्यासाठी करा. दिवसभर अति काम करावं लागेल. त्यामुळे खूप थकाल. मदतीचे प्रस्ताव स्वीकारताना सावध राहा. कारण आज फसवणुकीची शक्यता आहे. वाढत्या खर्चांना पुरतील एवढे पैसे उभारण्याची चिंता तुम्हाला सतावेल. जोडीदार प्रेमाचा वर्षाव करील.
advertisement
Lucky Number : 6
Lucky Colour : Blue
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
भावंडांशी रिलेशनशिप चांगली आहे. आज जे वाद टाळता येतील ते टाळा. फ्लूचा संसर्ग होऊ शकतो. काळजी घ्या. खर्च वाढतील. त्यामुळे बचतीच्या पैशांत हात घालावा लागू शकतो. रिलेशनशिपमध्ये इंटिमसी (जवळीक) वाढवण्याची इच्छा असेल.
advertisement
Lucky Number : 22
Lucky Colour : Yellow
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमची भावंडं मदत करणारी आहेत. छोट्या प्रयत्नांतून मोठा लाभ मिळतो. आज महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क साधाल. पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. हलकं खा. शेअर मार्केट किंवा लॉटरीतून पैसे मिळतील. जोडीदाराशी भांडणांमुळे विनाकारण टेन्शन येईल.
Lucky Number : 18
Lucky Colour : Red
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुम्ही बऱ्याच काळापासून ज्याची वाट पाहत होतात, ते रेकग्निशन तुमच्याकडे चालून येत आहे असं वाटतं. आयुष्यात आरामदायक सुखं असावीत ही इच्छा दिवसभर कायम राहील. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा उच्च स्थानी आहे. त्यामुळे शक्तिशाली वाटत आहे. प्रमोशनसाठी तुमचा विचार होऊ शकतो. ब्लाइंड डेटला जाणं ही चांगली कल्पना असू शकत नाही.
Lucky Number : 7
Lucky Colour : Peach
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
स्थानिक अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेलं काम हळूहळू पुढे सरकेल, पण नक्की पुढे जाईल. प्रभाव उदयाला येईल, वाढेल. भरपूर कोलेस्टेरॉल असलेलं अन्न खाऊ नका. फळं, भाजीपाला अधिक खा. आजच्या दिवसासाठी अनेक प्लॅन्स आखले आहेत आणि ते बऱ्यापैकी पूर्ण होतील. विवाहबाह्य संबंधांत अडकू शकाल.
Lucky Number : 22
Lucky Colour : Indigo
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 25, 2025 7:15 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: बऱ्याच काळापासूनचं टेन्शन दूर! 4, 13, 22, 31 या जन्मतारखा असणाऱ्यांना खुशखबर


