उंदराचे प्रतीकात्मक महत्त्व - गणपतीच्या मूर्तीसोबत नेहमी उंदीर का असतो, यामागे एक गूढ अर्थ दडलेला आहे. उंदीर हे अनेक गोष्टींचे प्रतीक मानले जाते. लोभ आणि वासनांवर नियंत्रणाचे प्रतिक, उंदीर हा खादाड स्वभावाचा असतो आणि त्याला कोणत्याही गोष्टीचा मोह पटकन होतो. तो कोणत्याही वस्तूंना कुरतडून खातो, मग ती चांगली असो वा वाईट. हा स्वभाव मानवी लोभ, वासना आणि स्वार्थीपणाचे प्रतीक आहे. गणपती बाप्पा उंदरावर स्वार झालेले दिसतात, याचा अर्थ त्यांनी या सर्व गोष्टींवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे.
advertisement
उंदीर कोणत्याही अडथळ्यांमधून सहज मार्ग काढतो. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि त्यांचे वाहन उंदीर हे अडथळ्यांवर मात करण्याचे प्रतीक आहे. उंदराला जमिनीखालील गोष्टींची माहिती असते, त्यामुळे तो ज्ञानाचे प्रतीक आहे. गणपती हे बुद्धीची देवता आहेत, असंही मानलं जातं.
गणेशोत्सवात स्वप्नात उंदीर दिसण्याचा अर्थ -
गणेशोत्सवाच्या काळात स्वप्नात उंदीर दिसल्यास तो एक शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. या स्वप्नाना अर्थ तुमची कोणतीतरी मोठी इच्छा किंवा काम लवकरच पूर्ण होणार आहे. तुमच्या आयुष्यात असलेल्या अडचणी आणि समस्या आता दूर होणार आहेत. गणपती बाप्पा तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहेत, असा हा संकेत आहे. तुमच्या आयुष्यात लवकरच मोठे आणि सकारात्मक बदल घडणार आहेत. उंदीर धान्याचा नाश करतो, पण त्याचबरोबर तो समृद्धी आणि धन-संपत्तीचेही प्रतीक मानले जाते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. असं स्वप्न म्हणजे तुम्हाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळाला आहे आणि ते तुमच्यावर प्रसन्न आहेत, याचा स्पष्ट संकेत आहे.
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात पांढरा उंदीर धावताना पाहणे शुभ मानले जाते. हे स्वप्न धन, सौभाग्य तसेच श्री गणेशाच्या आशीर्वादाचं प्रतिक दर्शवते.
फोनवरून फक्त आश्वासनंच मिळतात? तुमच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक हा असेल
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)