शास्त्रानुसार आपण कुठेही बसून अन्न खाऊ शकत नाही. वास्तुशास्त्रानुसार, जेवताना योग्य दिशेला तोंड असणे खूप महत्वाचे आहे. चुकीच्या दिशेला तोंड करून जेवल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर आणि नशिबासह अनेक गोष्टींवर वाईट परिणाम होतो. सतत काही दिशांना तोंड करून जेवण केल्यास मृत्यू देखील होऊ शकतो. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार डॉ. अरविंद पचौरी यांच्याकडून जाणून घेऊया, जेवताना कोणत्या दिशेला तोंड करावे.
advertisement
जेवण करण्यासाठी योग्य दिशा-
पूर्व दिशा - वास्तुशास्त्रानुसार, पूर्वेला तोंड करून जेवायला बसणं सर्वात शुभ मानलं जातं. या दिशेला तोंड करून जेवायला बसल्यानं आपले आरोग्य चांगले राहते आणि मानसिक शांती देखील मिळते. यासोबतच, ही दिशा आपल्या पचनासाठी देखील चांगली मानली जाते.
उत्तर - वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा देखील जेवायला बसण्यासाठी खूप चांगली मानली जाते. उत्तर दिशेला तोंड करून बसल्यानं चांगले आरोग्य आणि चाणाक्ष बुद्धी मिळते. असे अन्न आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारित करण्यास मदत करते. संपत्ती आणि शिक्षणाशी संबंधित कामांसाठी उत्तरेकडे तोंड करून अन्न खाणे चांगले मानले जाते.
पैसा,पद-प्रतिष्ठा सगळं 2025 मध्ये मिळवणार! बाबा वेंगांच्या यादीतील या 4 लकी राशी
या दिशेला तोंड करून जेवू नये -
वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला तोंड करून कधीही अन्न खाऊ नये. जेवताना या दिशेला तोंड असणे घातक ठरू शकते, एखाद्याचा अकाली मृत्यू देखील होऊ शकतो. ही दक्षिण दिशा यमराजाशी संबंधित असल्याने या दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्याने नकारात्मक उर्जेवरही परिणाम होऊ शकतो. या दिशेला तोंड करून जेवल्यानं अन्नाचा एक भाग त्यांच्याकडे जातो. म्हणून, जेवताना या दिशेला तोंड करू नये.
IAS-IPS बनतात या मूलांकावर जन्मलेली मुलं! या नंबरचा असतो यशामध्ये मोठा रोल
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)