वृषभ : तुम्ही जोडीदार पूर्णपणे कनेक्टेड आहात. बऱ्याच काळाचा विचार करता तुम्ही खूप आनंदी आहात. जोडीदाराला प्रपोझ करण्याच्या विचारात असलात, तर आज त्यासाठी उत्तम दिवस आहे. तुमचं प्रपोझल स्वीकारलं जाण्याची शक्यता आहे. आज संधी घ्या आणि ते केल्याबद्दल तुम्हाला आनंद वाटेल.
मिथुन : आज जोडीदारासोबत घरात राहू नका. बाहेर पडा. मजा घ्या. डान्स क्लास किंवा सिनेमाची एकत्र मजा घ्या. त्यामुळे एकसुरीपणा संपेल आणि तुम्ही दोघं पुन्हा एकमेकांशी बोलू लागाल.
advertisement
कर्क : छोट्या सहलीसाठी गावाबाहेर जाण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी रिकनेक्ट होण्याची ही चांगली संधी आहे. मजा करा. ताजंतवानं वाटेल. जोडीदार प्रेमाचा वर्षाव करील. त्यामुळे प्रेम वाटेल. तुम्ही मुलांना आजी-आजोबांकडे सोडलं असेल, तर स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही बाहेर असताना ती चांगला वेळ व्यतीत करतील.
सिंह : रिलेशनशिपमधून तुम्हाला काय हवं आहे, यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या इच्छा जोडीदाराला माहिती माहिती होऊ द्या. सकारात्मक परिणाम मिळवा. जोडीदारासोबत काही वेळ व्यतीत करणं सध्या गरजेचं आहे. रिलॅक्स व्हा. प्रेमाच्या शोधात असलात, तर डोळे उघडे ठेवायला हवेत. तुमच्यासाठी असलेलं कोणी तरी सापडेल.
परिस्थिती नसताना एकटा लढलो! या राशींचे आता नशीब उजळणार; अनेक मार्गांनी लाभ
कन्या : जोडीदार पाठबळ देईल. तुम्ही त्यांना पाठबळासाठी बोलावता, तेव्हा त्यांचं कौतुक करायलाही विसरू नका. लव्हिग अटिट्यूडला तातडीने प्रतिसाद द्या.
तूळ : जोडीदारायला भेटायला ट्रिपला जाल किंवा एकत्र ट्रिपला जाल. मित्र, कुटुंबीयांना मागे ठेवून फक्त दोघांनाच वेळ व्यतीत करायला मिळेल. एकमेकांना समजून घ्यायची संधी मिळेल. संध्याकाळी सहवासाचा आनंद घ्याल.
वृश्चिक : कपल्स एकमेकांच्या रिलेशनशिपवर समाधानी आहेत. त्यांना शांतता आणि स्थैर्य मिळत असल्याचं लक्षात येईल. सुखाच्या या दिवसांचा आनंद घ्या. कारण ते कायम टिकणार नाहीत. रेस्तराँमध्ये जा, डेझर्ट घ्या.
धनू : जोडीदारासोबतची रिलेशनशिप गोड आहे. प्रेमळ पाठिंबा प्रत्येक गोष्टीत मिळतो. सलोख्याच्या काळात आहात. भावना व्यक्त करा आणि प्रेमाचा प्रतिसादही मिळेल. सिंगल्सनी चांगले गुण विकसित करावेत. कारण कोणी तरी त्याची दखल घेईल.
मकर : दयाळूपणा, संवेदनशीलता सर्वोच्च पातळीवर आहे. जोडीदाराचा प्रतिसाद आहे. अधिक आकर्षक आणि कॉन्फिडंट असल्यानंतर जोडीदाराकडून चांगला प्रतिसाद मिळतो, असं लक्षात येईल. आज चांगला संवाद साधा आणि चांगलं ऐकूनही घ्या. रिलेशनशिप नव्या उंचीवर जाईल.
बऱ्याच काळापासूनचं टेन्शन दूर! 4, 13, 22, 31 या जन्मतारखा असणाऱ्यांना खुशखबर
कुंभ : आकर्षकपणामुळे तुम्ही आकर्षणबिंदू ठराल. साऱ्यांच्या नजरा तुमच्यावरच खिळलेल्या आहेत. हे तुम्हाला आवडेल. आनंद घ्या, पण डॉमिनेट करायला देऊ नका. उत्साह मिळेल. तुमचे केवळ गुड लूक्स नकोत, तर आकर्षक व्यक्तिमत्त्व दाखवा.
मीन : जोडीदारासोबत चांगलं चाललं आहे. आयुष्य आनंदाचं आहे. या दिवसाची ऊब आणि प्रेम अनुभवा. रिलेशनशिपच्या विशेष आनंदाने मन भरून घ्या. बंध दृढ होण्यासाठी जोडीदाराला ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत ते सांगा.
