TRENDING:

Ganpati Idol Vastu: घरात बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यापूर्वी 10 वास्‍तु नियम समजून घ्या

Last Updated:

Ganpati Idol Vastu: हिंदू पुराणानुसार, याच दिवशी पार्वती मातेने गणपतीला मातीपासून तयार केले होते. गणपतीला बुद्धी, ज्ञान आणि समृद्धीची देवता मानले जाते. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गणरायाच्या आगमनाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. बाजारपेठांमध्ये सर्वत्र गर्दी दिसत आहे. गणेश चतुर्थी हा सण श्री गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू पुराणानुसार, याच दिवशी पार्वती मातेने गणपतीला मातीपासून तयार केले होते. गणपतीला बुद्धी, ज्ञान आणि समृद्धीची देवता मानले जाते. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते, कारण तो विघ्नहर्ता आहे, श्री गणेश सर्व अडचणी दूर करतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
News18
News18
advertisement

गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण आहे. या सणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे, हा सण अनेक शतकांपासून चालत आला आहे. गणेश चतुर्थी दिवशी घरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करताना वास्तुशास्त्र नियमांची काळजी घ्यावी. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत ​​आहेत.

advertisement

गणेशाच्या मूर्तीशी संबंधित वास्तुचे महत्त्वाचे नियम -

घरात गणेशाची मूर्ती ठेवण्यापूर्वी ती कोणत्या प्रकारची असावी आणि ती कुठे ठेवावी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वास्तुनुसार, योग्य ठिकाणी आणि योग्य स्वरूपात ठेवलेली मूर्ती घरात सुख-समृद्धी आणते, तर चुकीच्या पद्धतीने ठेवल्याने कलह, मानसिक ताण आणि आर्थिक समस्या देखील उद्भवू शकतात.

1. बाथरूम किंवा शौचालयाजवळ गणेशाची मूर्ती किंवा फोटो स्थापन होणार नाही याची काळजी घ्या, ते खूप अशुभ मानले जाते.

advertisement

2. बेडरूममध्ये गणेश स्थापना करणे योग्य नाही, पती-पत्नीमधील नात्यात अनावश्यक तणाव निर्माण होतो.

3. मूर्ती नेहमी स्वच्छ ठिकाणी, प्रकाश भरपूर असणाऱ्या ठिकाणी ठेवावी, अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवणे टाळा.

4. घरात श्री गणेशाची नृत्य करणारी मूर्ती ठेवणे योग्य मानले जात नाही. असे मानले जाते की यामुळे कुटुंबात भांडणे आणि अशांतता वाढते.

5. अशी मूर्ती एखाद्याला भेट देणे देखील अशुभ आहे कारण त्यामुळे त्यांच्या आयुष्यातही कलह येऊ शकतो.

advertisement

6. लग्नात गणपतीची मूर्ती भेट देणे निषिद्ध मानले जाते. लक्ष्मी आणि श्री गणेश नेहमीच एकत्र राहतात, असे मानले जाते. जर एखाद्या मुलीला लग्नात गणपतीची मूर्ती दिली तर घराची समृद्धी देखील तिच्यासोबत जाते. म्हणूनच ही परंपरा शुभ मानली जात नाही.

बेस्ट पार्टनर..! दोघांच छान जमेल; 4,13, 22, 31 जन्मतारखा असणाऱ्यांचे लकी मूलांक

advertisement

7. घरात गणेशाची वाममुखी (डाव्या सोंडेची) मूर्ती ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. ती ठेवल्याने घरात सुख, शांती आणि प्रगती टिकते.

8. दक्षिणाभिमुखी (उजव्या सोंडेची) गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत. जर पूजा योग्यरित्या केली नाही तर त्याचे परिणाम उलटे होऊ शकतात.

9. ज्यांना संतती सुखाची इच्छा आहे त्यांच्यासाठी बालस्वरूप गणेशाची मूर्ती खूप शुभ मानली जाते.

10. करिअर आणि व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी घरात सिंदूरी स्वरूप गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.

तुमच्या मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक आहे? मुली-महिलांचे येतात जास्त कॉल्स

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Ganpati Idol Vastu: घरात बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यापूर्वी 10 वास्‍तु नियम समजून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल