पहिली रेषा (आटी) - पैशाची रेषा
कपाळाच्या तळाशी, भुवयांच्या अगदी वर असलेल्या रेषेला संपत्तीची रेषा म्हणतात. ही रेषा स्पष्ट, खोल आणि अखंडित असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. पण जर ही खंडित, लहान किंवा हलकी असेल तर आर्थिक समस्या वारंवार येत राहतात.
दुसरी आटी - आरोग्य रेषा
advertisement
ही आटी पैशाच्या रेषेच्या अगदी वर आढळते. ती जाड आणि स्पष्ट असेल तर व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. हलकी आणि पातळ असेल तर ती व्यक्ती सतत आजारी राहते. खंडित असेल तर त्या व्यक्तीला दीर्घकाळ आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
तिसरी आटी - नशिबाची
ही रेषा कपाळाच्या मध्यभागी आढळते. खालून मोजल्यास येणारी तिसरी आटी नशिबाची मानली जाते. ही रेषा लहान असली तरी ती व्यक्ती भाग्यवान असते. कपाळावर तीन सरळ समांतर रेषा अत्यंत भाग्यवान मानल्या जातात. अशा लोकांना आयुष्यात खूप यश आणि प्रगती मिळते.
चौथी आटी - जीवनातील संघर्षाची
खालून तिसऱ्यारेषेनंतर दिसणारी चौथी रेषा फार कमी लोकांमध्ये आढळते. ही रेषा कपाळावर असेल तर आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. अशा व्यक्तीला २८ ते ४० वर्षे वयापर्यंत खूप संघर्ष करावा लागतो. पण, वयाच्या ४० व्या वर्षानंतर अशा लोकांना मोठे यश आणि स्थिरता मिळते.
कितीही प्रयत्न करा, जमणारच नाही! या जन्मतारखांची जोडी सहजीवनात अपयशी ठरते
पाचवी आटी - चिंता आणि तणावाची
ही आटी केस सुरू होतात तिथून जवळ असते. ज्या लोकांच्या कपाळावर ही रेषा असते, त्यांना आयुष्यात कितीही यश मिळाले तरी ते नेहमीच कशा ना कशाची तरी काळजी करत राहतात. बऱ्याचदा असे लोक आयुष्यात कधीतरी संन्यासाकडे वळतात.
सहावी आटी - दैवी कृपेची
ही सर्वात दुर्मिळ रेषा मानली जाते, ती नाकापासून सरळ वर जाते, जणू टिळा लावला जातो. याला दैवी रेषा म्हणतात. अशी रेषा असलेल्या लोकांना त्यांच्या मागील जन्मातील चांगल्या कर्मांमुळे अचानक चमत्कारिक प्रगती होते आणि अचानक धनप्राप्त होते. अशा लोकांना जीवनात विशेष आदर आणि प्रतिष्ठा मिळते.
ज्याची भीती होती तेच! राहु-मंगळाचा संयोग संकटे वाढवणार, या 4 राशींचं मोठं नुकसान
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)