या दिवशी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केल्याने सर्व पितरांना मुक्ती मिळते. जर वर्षभरात कोणत्याही पितरांचे श्राद्ध राहिले असेल, तर या दिवशी विधी केल्यास त्या दोषातून मुक्ती मिळते. याशिवाय, ज्या व्यक्तींचा अकाली किंवा अपघाती मृत्यू झाला असेल, त्यांचेही श्राद्ध अमावस्येच्या दिवशी करता येते.
पितृदोषाचे त्रास आणि उपाय - पितृदोष म्हणजे पूर्वजांचे आशीर्वाद न मिळणे. हा दोष अनेकदा कुटुंबात अशांतता, आर्थिक समस्या, आरोग्याच्या समस्या किंवा संतती नसणे यांसारख्या अडचणी निर्माण करू शकतो.
advertisement
पितृदोषाची काही लक्षणे:
घरात सतत भांडणे किंवा वादविवाद होणे.
घरातील लोक नेहमी आजारी असणे.
व्यवसायात किंवा नोकरीत सतत अपयश येणे.
विवाह जुळण्यास किंवा संतती होण्यास अडचणी येणे.
कर्जबाजारीपणा वाढणे.
जिथं जातील तिथं पहिल्या नंबरातच..! या जन्मतारखांच्या मुली कुटुंबाचं नशीब पालटतात
पितृदोषाचे उपाय -
या दिवशी आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण विधी करा. दर अमावस्येला पिंपळाच्या झाडाला पाणी, दूध आणि तीळ अर्पण करा. पिंपळाच्या झाडाला पितरांचे निवासस्थान मानले जाते. पितृपक्षात किंवा कोणत्याही अमावस्येच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्न, वस्त्र किंवा इतर वस्तूंचे दान करा. जर पितृदोष खूप जास्त असेल, तर कोणत्याही तीर्थस्थळी (उदा. त्र्यंबकेश्वर, गया) नारायण बली हा विशेष विधी करा. पितृपक्षात पवित्र ठिकाणी जाऊन पिंडदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. श्राद्धाच्या दिवशी किंवा दररोज गाय, कुत्रा आणि कावळ्यांना भोजन द्या. धार्मिक मान्यतेनुसार, कावळे हे पितरांचे प्रतीक मानले जातात. अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास उपवास करा.
हे सर्व उपाय केवळ धार्मिक विधी नसून, आपल्या पूर्वजांप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता येते आणि कुटुंबात सुख-शांती नांदते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक असणं चंचलतेचं कारण? प्रगती साधतात पण...
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)