कुंडलीत बुध चांगल्या स्थितीत असेल तर व्यक्ती निर्णय घेण्यात चपळ, स्मरणशक्तीत चांगली आणि विचारपूर्वक वागणारी असते. मात्र बुध कमजोर असेल तर व्यक्ती भावनिकदृष्ट्या अस्थिर, लवकर रागावणारी आणि कधी बऱ्याच गोष्टीत समजूतदारपणात कमी पडणारी दिसते. याचा परिणाम फक्त नोकरी किंवा सामाजिक आयुष्यापुरता मर्यादित नसून कुटुंब आणि मुलांच्या भवितव्यावरही होतो. त्यामुळेच ज्योतिषशास्त्रात बुधाला खूप महत्त्व दिले जाते.
advertisement
बुध कमकुवत असल्याची लक्षणे आणि त्याचा परिणाम -
बुध कमजोर असेल तर व्यक्ती आपली गोष्ट नीट मांडू शकत नाही. अनेकदा रागाच्या भरात बोलून वाद वाढवते किंवा छोट्या गोष्टींवर भांडण करते. याउलट बुध मजबूत असलेली व्यक्ती आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करते आणि इतरांशी समजूतदारपणे संवाद साधते.
स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता - बुधाचा थेट संबंध मेंदू आणि स्मरणशक्तीशी असतो. बुध कमकुवत असल्यास व्यक्तीला गोष्टी विसरण्याची सवय लागते किंवा जुन्या आठवणींमध्ये अडकून राहते. तर बुध मजबूत असल्यास नवीन गोष्टी लवकर शिकता येतात आणि त्या दीर्घकाळ लक्षात राहतात.
धनूसहित 4 राशींचे नशीब पालटण्याची वेळ! 18 डिग्रीतील राहु सगळं चित्र बदलेल
कौटुंबिक जीवनावर परिणाम - ज्योतिषानुसार बुध कमजोर असल्यास संतती सुख मिळत नाही, त्यात अडचणी येऊ शकतात. घरातील परस्पर समज कमी होऊ शकते आणि मुलांच्या विकासावरही त्याचा परिणाम दिसतो. मुलांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की कुटुंब आणि समाजात प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असते.
बुधाचा प्रभाव फक्त घर किंवा ऑफिसपुरता मर्यादित नसतो. समाजात वावरताना तुमची विचारसरणी आणि वागणूक यावरही बुधाचा परिणाम होतो. उदाहरणार्थ, महिलांबद्दल आदरभाव, इतरांशी बोलण्याची पद्धत, सार्वजनिक ठिकाणी वर्तन या सगळ्यांवर बुधाचा प्रभाव दिसून येतो.
बुध मजबूत करण्यासाठी उपाय -
निर्णय घेताना शांतपणे विचार करा आणि घाई टाळा.
वाचन, अभ्यास आणि नवीन गोष्टी शिकण्याची सवय लावा.
मुलांना इतरांचा आदर करण्याचे संस्कार द्या.
रागावर नियंत्रण ठेवा आणि भावना शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
टेन्शन सोडा, इतक्या सहज होणार काम; मकर संक्रातीच्या आधीच या राशींना शुभवार्ता
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
