TRENDING:

Palmistry: कधी ना कधी होणार तुरुंगाची वारी! तळहातावरील ही रेषा तुटलेली असणं त्याचा स्पष्ट संकेत

Last Updated:

Marathi Astrology: तळहातावरील रेषा आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगू शकतात. हस्तरेषाशास्त्रातील तज्ज्ञ कोणाच्याही तळहातावरील रेषा पाहून त्या व्यक्तीचे नशीब, संपत्ती, करिअर, वय, आरोग्य आणि बरेच काही सांगू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हस्तरेषाशास्त्राला ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचं स्थान आहे. तळहातावरील रेषा आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगू शकतात. हस्तरेषाशास्त्रातील तज्ज्ञ कोणाच्याही तळहातावरील रेषा पाहून त्या व्यक्तीचे नशीब, संपत्ती, करिअर, वय, आरोग्य आणि बरेच काही सांगू शकतात. कोर्ट-केस, तुरुंगवास याबाबतची माहितीसुद्धा तळहातावरील रेषा पाहून सांगता येते. तळहातावरील कोणत्या रेषा तुरुंगात जाण्याची शक्यता दर्शवतात, याविषयी जाणून घेऊ.
News18
News18
advertisement

हस्तरेषा तज्ज्ञ दर्शन पाठक सांगतात की, एखाद्या व्यक्तीच्या हातावरील धनरेषा एखाद्या व्यक्तीला तुरुंगात जाण्याची शक्यता दर्शवू शकते. अनेकांना भीती वाटत असते की, आपल्याला कधीही तुरुंगात जावे लागू नये. पाठक यांनी सांगितलं की, कोणत्याही व्यक्तीच्या हातावरील धनरेषा तुटलेली, खूप अस्पष्ट किंवा काही जागी नसतेच, तेव्हा आयुष्याच्या त्या टप्प्यावर तुरुंगात जाण्याची शक्यता वाढते.

advertisement

तुरुंगवासाव्यतिरिक्त, ही रेषा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता दर्शवते. गुंतवलेले पैसे बुडू शकतात, किंवा तुमची नोकरी जाऊ शकते किंवा तुम्हाला विभागीय चौकशीला सामोरे जावे लागू शकते. धनरेषा पाहून व्यक्तिच्या स्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो.

तुरुंग रेषा असते?

धनरेषेच्या काही ठिकाणी अस्पष्ट दिसणाऱ्या भागाला आपण तुरुंग रेषा म्हणू शकतो. काही लोक भाग्य रेषेला धन रेषा मानतात. धन रेषा तुमच्या जीवन रेषेतून किंवा मेंदू रेषेतून उगम पावू शकते, हृदय रेषा ओलांडू शकते आणि शनि, सूर्य किंवा गुरू पर्वतापर्यंत पसरू शकते. धन रेषा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. काहींमध्ये ती स्पष्ट, काहींमध्ये लांब आणि काहींमध्ये अस्पष्ट आणि लहान असू शकते.

advertisement

कोर्ट केस में फंसाने वाली रेखा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुमच्या घरी देखील लहान मुली मेकअप करतात? तर थांबवा, नाहीतर होतील गंभीर परिणाम 
सर्व पहा

हाताच्या बाहेरील बाजूस म्हणजे मंगळाच्या भागात, म्हणजेच तुमच्या करंगळीच्या खाली असलेल्या भागात हृदयरेषेच्या खाली आडव्या रेषा असतील, तर अशा रेषांमुळे तुमचे अनेक शत्रू असू शकतात. ते तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकवू शकतात. हातावर अशा रेषा असणाऱ्या लोकांना अनेकदा न्यायालयाची पायरी चढावी लागते. बाहेरील मंगळाच्या क्षेत्रावरील या रेषा वाद निर्माण करणाऱ्या मानल्या जातात.

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Palmistry: कधी ना कधी होणार तुरुंगाची वारी! तळहातावरील ही रेषा तुटलेली असणं त्याचा स्पष्ट संकेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल